Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch EV vs Citroen eC3: कोणती इलेक्ट्रिक कार खरेदी करणे तुमच्यासाठी जास्त बेस्ट?

जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Tata Punch EV आणि Citroen eC3 चांगल्या ऑप्शन्स आहेत. मात्र, दोघांपैकी बेस्ट कोणती?

  • By मयुर नवले
Updated On: Jan 01, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • Tata Punch EV आणि Citroen eC3 ला चागंली मागणी
  • दोघांपैकी बेस्ट कार कोणती? जाणून घ्या
पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत आजचा ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. इलेक्ट्रिक कार या पर्यावरणाच्या दृष्टीने तर चांगल्या आहेतच. मात्र, याशिवाय त्यांचा रनिंग आणि मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा कमी असतो. त्यामुळेच इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ होत आहे.

अशातच, जर तुम्ही पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला शहरात चालवण्यास सोपी, आरामात चार लोक बसू शकतील आणि चांगली रेंज देणारी कार हवी असेल, तर Tata Punch EV आणि Citroen eC3 हे दोन चांगले पर्याय आहेत. दोन्ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहेत आणि पूर्ण चार्जवर 240 किलोमीटरपेक्षा जास्त रेंजचा दावा करतात. मात्र, यापैकी कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट? चला जाणून घेऊयात.

January 2026 मध्ये ‘या’ एकपेक्षा एक सरस कार लाँच होण्याच्या रांगेत, जाणून घ्या संपूर्ण यादी

डिझाइन

टाटा पंच ईव्हीला अधिक फ्यूचरिस्टिक लूक दिला आहे. त्यात डिजिटल एलईडी डीआरएल, बंद फ्रंट ग्रिल आणि मजबूत एसयूव्हीसारखी स्टान्स आहे. लहान आकार असूनही, ही कार पॉवरफुल दिसते. दरम्यान, Citroen eC3 ची रचना सोपी आहे, जी पेट्रोल C3 सारखी आहे. त्यात स्प्लिट डीआरएल आणि हॅलोजन हेडलाइट्स आहेत. त्याचा पुढचा भाग थोडा स्पोर्टी आहे, परंतु एकूणच, पंच ईव्ही अधिक प्रीमियम वाटतो.

बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स

Citroen eC3 मध्ये 29.2 kWh एअर-कूल्ड बॅटरी आहे, जी कंपनीच्या मते 246 किमीची रेंज देते. त्याची मोटर 57 hp पॉवर आणि 143 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार शहरी ड्रायव्हिंगसाठी ठीक आहे, परंतु हायवेवर फार वेगवान वाटत नाही. दरम्यान, टाटा पंच EV दोन बॅटरी पर्यायांमध्ये येते – 25 kWh आणि 35 kWh. मोठ्या बॅटरीसह, त्याची रिअल वर्ल्ड रेंज सुमारे 280–290 किमीपर्यंत पोहोचू शकते. याची मोटर अधिक पॉवरफुल आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सहज आणि जलद होते. पंच EV मध्ये लॉंग बॅटरी वॉरंटी देखील मिळते.

‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

फीचर्स, इंटिरिअर आणि बूट स्पेस

Citroen eC3 मध्ये 10.2-इंचाचा टचस्क्रीन, डिजिटल मीटर, दोन ड्राइव्ह मोड आणि 315-लिटरचा मोठा बूट स्पेस आहे. मात्र, त्यात अनेक प्रीमियम फीचर्सचा अभाव आहे. टाटा पंच ईव्ही फीचर्सच्या बाबतीत खूप पुढे आहे. त्यात दोन मोठे 10.24-इंच डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि पॅडल शिफ्टर्स सारखी फीचर्स आहेत. शिवाय, पंच ईव्हीला 5-स्टार सेफ्टी रेटिंग आहे, तर eC3 मध्ये सेफ्टी फीचर्स कमी पाहायला मिळतात.

किंमत

Citroen eC3 ची किंमत 12.90 लाख ते 13.53 लाख रुपयांपर्यंत आहे. टाटा पंच ईव्हीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक मॉडेलसाठी 14.44 लाख रुपयांपर्यंत जाते. याचा अर्थ पंच ईव्हीचे बेस मॉडेल अधिक परवडणारे आहे आणि त्यात अधिक विविधता आहे.

जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि अधिक फीचर्स , चांगली रेंज आणि मजबूत सुरक्षितता शोधत असाल, तर टाटा पंच ईव्ही बेस्ट कार आहे. सिट्रोएन ईसी३ साधे डिझाइन आणि मोठे बूट स्पेस शोधणाऱ्यांसाठी चांगला ऑप्शन आहे. एकूणच, टाटा पंच ईव्ही बहुतेक भारतीय ग्राहकांसाठी एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

Web Title: Tata punch ev vs citroen ec3 which electric car best in price features performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • automobile
  • Citroen C3
  • electric car
  • tata punch

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.