Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Automatic Car : ऑटोमॅटिक कार विकत घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

अनेक जण गिअरच्या कारपेक्षा 'ऑटोमॅटिक' कारला पसंती देत आहेत. मात्र, या गाड्यांचे काही फायदे आणि काही तोटेही आहेत. जे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 03:16 PM
ऑटोमॅटिक कार विकत घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

ऑटोमॅटिक कार विकत घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Follow Us
Follow Us:

मुंबई : आज आम्ही तुम्हाला कारसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आता गाड्यांमध्ये गिअर बदलण्याचे टेन्शन नाही. आता स्वयंचलित गाड्या आल्या आहेत. अनेक जण गिअरच्या कारपेक्षा ‘ऑटोमॅटिक’ कारला पसंती देत आहेत. मात्र, या गाड्यांचे काही फायदे आणि काही तोटेही आहेत. जे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. भारतातील अनेक लोक, विशेषतः जास्त वाहतूक असलेल्या शहरांमध्ये, आता मॅन्युअल कारऐवजी ऑटोमॅटिक कार निवडत आहेत. पण इतर कोणत्याही खरेदीप्रमाणे, ऑटोमॅटिक कारचेही स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. म्हणून, तुम्ही एक कार बुक करण्यापूर्वी, ऑटोमॅटिक कार घेण्याचे ४ फायदे आणि ३ तोटे जाणून घेऊया.

 

ऑटोमॅटिक कार घेण्याचे तोटे

1) किंमत जास्त असते

ऑटोमॅटिक कारची तंत्रज्ञान प्रणाली प्रगत असल्याने, मॅन्युअल मॉडेलच्या तुलनेत या गाड्यांच्या किमती जास्त असतात. गाडी खरेदी करतानाच तुम्हाला काही अतिरिक्त लाख रुपये मोजावे लागू शकतात.

2) देखभाल खर्च अधिक

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे गुंतागुंतीचे असते. त्यामुळे जर याच्या गिअरबॉक्समध्ये काही बिघाड झाला, तर तो दुरुस्त करण्याचा खर्च मॅन्युअल गाडीच्या तुलनेत खूप जास्त असतो. तसेच याची नियमित सर्व्हिसिंगही थोडी महाग पडू शकते.

3) गाडीवर कमी नियंत्रण

गाडी चालवण्याचे शौकीन असणारे ड्रायव्हर्स अनेकदा ऑटोमॅटिक कारला पसंती देत नाहीत. कारण, मॅन्युअल गाडीमध्ये गिअरवर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं, जे हायवेवर किंवा ओव्हरटेकिंग करताना खूप कामाला येतं. उत्साही ड्रायव्हर्सना ऑटोमॅटिकमध्ये तो ‘कंट्रोल’ मिळत नाही.

ऑटोमॅटिक कार घेण्याचे फायदे

1) चालवण्यास कार अत्यंत सोपी वाटते

ऑटोमॅटिक कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गिअर बदलण्याची कटकट नसते. तुम्हाला फक्त एक्सिलरेटर दाबायचा आहे आणि गाडी धावू लागते. विशेषतः शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर ही गाडी चालवणं खूपच सोयीस्कर ठरतं.

2) ड्रायव्हरचा थकवा कमी होतो

जर तुम्ही तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असाल, तर वारंवार क्लच दाबणं आणि गिअर बदलणं यामुळे पाय आणि हात खूप दुखतात. ऑटोमॅटिक कारमध्ये क्लचच नसल्यामुळे स्टॉप-अँड-गो ट्रॅफिकमध्येही ड्रायव्हरला फारसा थकवा जाणवत नाही.

3) आरामदायी प्रवास

मॅन्युअल कारमध्ये गिअर बदलताना कधीकधी झटका बसतो, मात्र ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गिअर बदलण्याची प्रक्रिया अत्यंत स्मूथ आणि सीमलेस असते. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखद आणि रिलॅक्स होतो.

4) नवीन चालकांसाठी वरदान

जर तुम्ही नुकतेच गाडी चालवायला शिकत असाल, तर क्लच आणि गिअरचं ट्युनिंग जुळवणं खूप कठीण जातं. अशा वेळी ऑटोमॅटिक कार शिकणं आणि चालवणं मॅन्युअलच्या तुलनेत खूपच सोपं आणि वेगवान असतं.

हे सुद्धा वाचा : रात्री गाडी चालवणे भीतीदायक वाटते? या स्मार्ट टिप्सने करा प्रवास सुरक्षित आणि तणावमुक्त

Web Title: Many people in india are preferring automatic cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • car driver
  • Car News
  • new car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.