रात्री गाडी चालवणे भीतीदायक वाटते? या स्मार्ट टिप्सने करा प्रवास सुरक्षित आणि तणावमुक्त
रात्री स्पष्ट दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाहेर पडण्यापूर्वी, तुमचे हेडलाइट्स, टेललाइट्स आणि इंडिकेटर्स धूळ किंवा घाणीपासून मुक्त असल्याची खात्री करा. घाणेरड्या दिव्यांमुळे प्रकाश मंद होऊ शकतो, ज्यामुळे रस्ता पाहणे कठीण होते. याव्यतिरिक्त, तुमची विंडशील्ड आणि बाजूचे आरसे पूर्णपणे स्वच्छ ठेवा. काचेवरील घाणीमुळे प्रकाश विखुरला जाऊ शकतो आणि तुमची दृष्टी आणखी बाधित होऊ शकते.
Tata Sierra EV: ‘ती’ पुन्हा येतेय! आयकॉनिक SUV कधी होणार लाँच, किंमत वाचून व्हाल वेडेपिसे
रात्री हाय बीमचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हाय बीम सतत चालू ठेवणे केवळ चुकीचेच नाही तर धोकादायकही आहे. जेव्हा एखादे वाहन जवळ येते, तेव्हा ताबडतोब लो बीमवर स्विच करा. प्रखर प्रकाशामुळे दुसऱ्या चालकाचे डोळे दिपूज होऊ शकतात आणि क्षणभर त्यांची दृष्टी बाधित होऊ शकते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. हाय बीमचा वापर फक्त रिकाम्या किंवा निर्मनुष्य रस्त्यांवरच करा.
गाडी चालवताना केबिन लाईट्स चालू ठेवणे तुमच्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. गाडीतील प्रकाशामुळे बाहेरील अंधाराशी जुळवून घेण्यास अडथळा येतो आणि विंडशील्डवर त्याचे प्रतिबिंब पडते, ज्यामुळे पुढील दृश्य अस्पष्ट दिसते. म्हणून, स्पीडोमीटरसारखी महत्त्वाची माहिती स्पष्टपणे दिसेल इतकाच प्रकाश गाडीमध्ये ठेवा.
रात्रीच्या वेळी अंतराचा अंदाज लावणे कठीण होऊ शकते, त्यामुळे पुढील वाहनापासून थोडे अधिक अंतर राखणे उत्तम. यामुळे, जर पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक लावला, तर तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसेच, अतिवेग टाळा आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नेहमी वाहनावर नियंत्रण ठेवा.






