Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 डिसेंबर लक्षात ठेवा! Maruti Suzuki ची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार होणार लाँच

येत्या 2 डिसेंबर 2025 ला Maruti e Vitara म्हणजेच मारुती सुझुकीची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 29, 2025 | 03:20 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार होणार लाँच
  • Maruti e Vitara दोन बॅटरी ऑप्शनसह होईल लाँच
  • येत्या 2 डिसेंबरला होणार लाँच
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळते आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki सुद्धा त्यांची इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

मारुती सुझुकी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी भारतात त्यांची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही, Maruti e Vitara लाँच करणार आहे. भारतातील ऑटो एक्स्पो 2025 मध्ये पहिल्यांदा याचे अनावरण करण्यात आले. ही कार फक्त भारतीय बाजारपेठेसाठी विकसित केली जात नाही तर 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहे. लाँच होण्यापूर्वीच, ही कार जागतिक उत्पादन बनली आहे. चला मारुती ई-विटारा लाँच होण्यापूर्वी तिच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

थोडी डेअरिंग आणि हातात Kia Carens Clavis EV ची चावी! जाणून घ्या Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

मार्केट गाजवणार

मेक-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार म्हणून मारुती ई विटारा भारतात एक नवीन ओळख निर्माण करत आहे. 26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये स्थानिक हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाचे उद्घाटन केले. त्याच दिवशी ई विटाराची पहिली निर्यात बॅच देखील सुरू करण्यात आली.

1 सप्टेंबर रोजी पिपावाव बंदरातून अधिकृतपणे निर्यात सुरू झाली. केवळ ऑगस्टमध्ये, यूके, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे आणि स्वीडनसह 12 युरोपीय देशांमध्ये 2900 हून अधिक युनिट्स पाठवण्यात आल्या. 100 हून अधिक देशांमध्ये ई विटारा पुरवण्याच्या योजनेमुळे ही मारुती सुझुकीची पहिली खऱ्या अर्थाने जागतिक इलेक्ट्रिक एसयूव्ही बनेल.

ती आली आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून गेली! Honda च्या ‘या’ कारची सगळीकडेच चर्चा

बॅटरी ऑप्शन आणि परफॉर्मन्स

49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरी पॅकसह मारुती ई विटारा उपलब्ध असेल. 49 किलोवॅट क्षमतेची FWD आवृत्ती 144 एचपी पॉवर आणि 189 एनएम टॉर्क जनरेट करेल, तर 61 किलोवॅट क्षमतेची FWD आवृत्ती 174 एचपी पॉवर आणि 189 एनएम टॉर्क जनरेट करेल. 61 किलोवॅट क्षमतेची ही टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती तिच्या सेगमेंटमधील सर्वात लांब-रेंजच्या ईव्हींपैकी एक असेल.

किती असू शकते अपेक्षित किंमत?

मारुती ई विटाराची किंमत भारतात 20 लाख ते 25 लाखांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. ही कार Tata Curvv EV, MG ZS EV, Mahindra BE 6, Vinfast VF6, आणि Hyundai Creta Electric शी स्पर्धा करेल.

 

Web Title: Maruti e vitara electric car is lauching on 2 december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!
1

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?
2

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!
3

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
4

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.