फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. तसेच आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसू शकतात, असे देखील अनेक जणांचे म्हणणे आहे. यामुळेच आता ज्या कंपन्या आदी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार्स मार्केटमध्ये आणत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहेत. आता मारुती सुझकी सुद्धा आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणणार आहे.
मारुती सुझुकीने आपल्या अनेक कार मॉडेल्स आणि पॉवरट्रेन पर्यायांसह भारतीय मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत, कंपनीने एकही इलेक्ट्रिक कार लाँच केलेली नाही, तेच दुसरीकडे इतर कंपन्यांची अनेक इलेक्ट्रिक मॉडेल्स आणली आहेत.
आता मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती ई- विटारा 2025 मध्ये भारतात लाँच होऊ शकते. ही कार भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. मारुती ई-विटारा कोणत्या डिझाइन, इंटिरियर्स, पॉवरट्रेन आणि फीचर्ससह येऊ शकते त्याबद्दल जाणून घेऊया.
६०० रुपयांत आणा बाईकवर शाईन; वापरा ही स्पेशल किट, गाडी राहील चमकत
अलीकडेच मारुतीने ई-विटाराचा पहिला टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये त्याचे फ्रंट एंड डिझाइन पाहिले जाऊ शकते. यात Y-आकाराचे एलईडी डीआरएल दिले गेले आहेत, जे त्याची स्टाइल आणखी आकर्षक बनवतात. याशिवाय, त्याच्या ग्लोबल मॉडेलमध्ये ब्लॅक-आउट चंकी बंपर आणि लीव्हर बंपरमध्ये फॉग लाइट्स आहेत.
त्याच्या साइड प्रोफाइलमध्ये 18 इंच ब्लॅक-आउट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हे मागील दरवाजाच्या हँडलमध्ये सी-पिलरवर बसवलेले दिसेल, जे आधुनिक रूप देखील देऊ शकते.
कनेक्टेड एलईडी टेल लाइट्स, शार्क फिन अँटेना आणि रूफ-माउंटेड स्पॉयलर देखील ई-विटाराच्या मागील बाजूस दिसू शकतात.
Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये ‘या’ कंपन्यांचा विशेष सहभाग, सादर करणार दमदार वाहनं
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, कंपनीने ई-विटारामध्ये सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो-होल्ड आणि लेव्हल-2 ADAS यासारखी प्रगत फीचर्स आहेत. जर या कारमध्ये ADAS फीचर्स उपलब्ध असेल, तर ती मारुतीची पहिली कार असेल, ज्यामध्ये हे प्रीमियम आणि अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स उपलब्ध असेल.
जसे कंपनीने e Vitara च्या रेंजबद्दल माहिती दिली नाही, त्याचप्रमाणे या कारच्या किंमतीबद्दल सुद्धा कंपनीने माहिती दिली नाही. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 2025 मध्ये होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लाँच केले जाईल. भारतीय बाजारपेठेत, ही कार 17 जानेवारी 2025 रोजी लाँच होणाऱ्या Tata Curvv EV, Mahindra BE 6, MG ZS EV आणि Hyundai Creta EV शी स्पर्धा करेल.