फोटो सौजन्य: iStock
2024 संपून आता नवीन वर्ष सुरु होण्यास कमी दिवस उरले आहे. येणाऱ्या नववर्षात भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हा ऑटो इव्हेंट होणार आहे, जिथे देश आणि विदेशातल्या ऑटो कंपन्या आपली वाहनं सादर करणार आहेत.
17 ते 22 जानेवारी या कालावधीत भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 होणार आहे. या कार्यक्रमाचे नव्या पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे आता ऑटो एक्स्पो हा भारत मोबिलिटी एक्स्पोचा एक भाग बनला आहे. 2025 मध्ये, ते भारत मंडपम, यशोभूमी (द्वारका, दिल्ली NCR) आणि इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट (ग्रेटर नोएडा) येथे आयोजित केले जाईल. यावेळी अनेक बाईक्स आणि स्कूटर सादर केल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हीचा समावेश असेल. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये कोणत्या बाईक्स आणि स्कूटर सादर केल्या जाऊ शकतात त्याबद्दल जाणून घेऊया.
2025 मध्ये भारतात ‘या’ इलेक्ट्रिक कार्स घालणार धुमाकूळ, ग्राहक आतापासूनच बुक करण्यासाठी आहेत तयार
यावेळी, EICMA 2024 मध्ये Hero MotoCorp ने सादर केलेल्या बाईक्स आणि स्कूटर्सची लाईन-अप देखील भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये दाखवली जाऊ शकते. यामध्ये Karizma XMR 250, Xtreme 250R, XPulse 210, Vida Z इलेक्ट्रिक स्कूटर सोबत Mavrick 440 आणि Karizma XMR 210 यांचा समावेश असू शकतो.
TVS मोटर कंपनी आपली आगामी बाईक Apache RTX 300 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सादर करू शकते. यासोबतच RT-XD4 इंजिन आणि अपडेटेड Ronin DS व्हेरियंट सादर केले जाऊ शकतात. हे दोन्ही मॉडेल Motosoul 2024 मध्ये सादर करण्यात आले आहेत.
या एक्सपोमध्ये एथर एनर्जी 450X इलेक्ट्रिक स्कूटर सादर करू शकते. याव्यतिरिक्त, ओला इलेक्ट्रिक आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक रेंज प्रदर्शित करू शकते, ज्यामध्ये ओला रोडस्टर देखील समाविष्ट आहे.
‘या’ आहेत देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या 5 कार्स, किंमत कमी आणि फीचर्स जास्त
होंडा देखील इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारात प्रवेश करत आहे. या इव्हेंटमध्ये Activa e आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होण्याची शक्यता आहे.
टायर उत्पादक कंपन्या भारत मोबिलिटी एक्स्पो २०२५ मध्ये त्यांचे नवीन लाँचिंग्स सादर करतील. यामध्ये Ceat Tyres, Apollo Tyres, JK Tyre, MRF, Bridgestone, Michelin, आणि Goodyear सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश असेल.
सुझुकी मोटरसायकल, बजाज ऑटो, बीएमडब्ल्यू मोटरराड आणि यामाहा सारख्या कंपन्या या एक्स्पोमध्ये त्यांच्या नवीन रेंज सादर करणार आहेत. यासह, रिव्हॉल्ट, ग्रीनवे मोबिलिटी, मॉन्ट्रा इलेक्ट्रिक, न्यूमेरोस आणि अँपिअर सारख्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप देखील त्यांची उपस्थिती दर्शवतील.