फोटो सौजन्य - Social Media
काही लोकांना आपल्या बाईकवर इतके प्रेम असते कि बाईक म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. अनेक जण बाईकला स्वतःच्याच शरीराचा भाग म्हणून बघतात. अशा वेळी त्यांना स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपली जबाबदारी बनून जाते. अनेक लोक ही जबाबदारी नियमितपणे स्वतःच्या हाताने पार पाडत असतात. तर काही जण आपल्या बाईकला क्लिनिंगसाठी देतात. तर काही जण वेळेच्या अभावामुळे या सर्व गोष्टी करून आपल्या गाडीची निगा राखण्यात कमी पडतात. जर तुम्ही या गोष्टींना सामोरे जात आहात तर लक्षात असू द्या कि बाजारात बाईक केयर किट मिळते. ज्याच्या साहाय्याने तुम्ही कमी दरामध्ये स्वतःच्या बाईकची निगा राखू शकता. आपल्या बाईकला स्वच्छ आणि नीट नेटके ठेवू शकता.
बाईक किट बाजारातही मिळते आणि इ मार्केटमध्येही मिळते. फ्लिपकार्ट आणि अमेजोनसारख्या पर्यायांवर या बाईक किट अगदी स्वस्त दरामध्ये मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात, या बाईक किटमध्ये आपल्याला काय काय गोष्टी मिळतात?
बाईक केयर किटमध्ये अनेक प्रकारचे साधन उपल्बध असतात. या साधनांचा वापर बाईकला नव्या सारखी चमक देण्यासाठी केली जाते. या किटमध्ये वॉश शाम्पू असतो. तसेच बाईक पॉलीस लिक्विड असतो. मुळात याचे प्रमाण 100ml ते 150ml इतके असते. तसेच यांच्यासह मल्टी पर्पज स्प्रे, चेन क्लिनर स्प्रे आणि चेन ल्यूब स्प्रेदेखील या किटमध्ये उपल्बध असते. याचे प्रमाण 150ml ते 200ml इतके असते. तसेच पॉलीस करण्यासाठी एक स्पंज किटही सोबत दिली जाते.
अशा प्रकारे हटवता येईल तुमच्या बाइकवरचे स्क्रॅच आणि डाग: