Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki च्या या कारची परदेशातही भुरळ ! 900 हून जास्त टक्क्यांनी वाढली निर्यात

सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या एका कारने जबरदस्त दबदबा निर्माण केला आहे. जगभरात या कारच्या निर्यातीमध्ये तब्बल 900 टक्के वार्षिक वाढ झाली आहे.. जाणून घेऊया या कारबद्दल  

  • By नारायण परब
Updated On: Oct 26, 2024 | 06:34 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय कार बाजारामध्ये गेली अनेक दशकांपासून मारुती सुझुकी कंपनीचे  वर्चस्व आहे. कंपनीच्या भारतीय ग्राहकांना लक्षात ठेऊन निर्मिती केलेल्या कार देशातील ग्राहकांच्या पसंतीस पडतात. मात्र आता या कार परदेशातील ग्राहकांनाही आवडू लागल्या आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या एका कारने दबदबा निर्माण केला आहे. या कारची निर्यात जगभरात प्रचंड वाढली आहे. जाणून घेऊया या कारबद्दल

भारतीय ग्राहकांमध्ये मारुती सुझुकी अल्टो ही नेहमीच लोकप्रिय कार राहिली आहे. कारची किंमत ही ग्राहकांना परवडणारी आहेच तसेच कारही तिच्या विश्वासार्ह कार्यक्षमतेसाठी देखील प्रसिद्ध आहे. जर  सप्टेंबर 2024 च्या देशांतर्गत कार बाजारातील विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, मारुती सुझुकी अल्टोने 8,655 युनिट्सच्या विक्रीसह टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहेच मात्र निर्यातीमध्ये  या कारने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. अल्टोच्या सप्टेंबर महिन्यात 927.91 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 442 युनिट्सची निर्यात करण्यात आली.   सप्टेंबर 2023 मध्ये हा कार निर्यातीचा आकडा केवळ 43 युनिट्स होता.

हे देखील वाचा- आता Alto सारख्या लहान कारनाही बनवता येते बुलेटप्रुफ; जाणून घ्या नेमका किती येतो खर्च?

फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

अल्टोमध्ये पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय

मारुती अल्टो K10 मध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 67bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससहित येते. तसेच महत्वाचे म्हणजे कारमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे, जो 57bhp पॉवर आणि 82Nm टॉर्क जनरेट करतो.

कमालीचा मायलेज

कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास  , मारुती सुझुकीकडून दावा आहे की, कार मॅन्युअल प्रकारात 24.39 kmpl, ऑटोमॅटिक प्रकारात 24.90 kmpl आणि CNG प्रकारात 33.85 km/kg मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो K10 ही सध्या बाजारपेठेत चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

हे देखील वाचा-बुलेटप्रेमींनो आता येणार Hunter 350 चे अपडेटेड व्हर्जन, Royal Enfield कडून लाँचिंगची तयारी सुरू

अल्टोमधील वैशिष्ट्ये

कारच्या वैशिष्टयांबद्दल विचार केल्यास  अल्टोमध्ये  7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर ॲडजस्टेबल ORVM सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने यात ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस टेक्नॉलॉजी आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.

किफायतशीर किंमत

या कारचे स्पर्धक हे  Renault Kwid, Maruti Suzuki S-Presso आहेत. Maruti Suzuki Alto K10 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे तर या कारच्या  टॉप व्हेरियंटची एक्स शो रुम किंमत 5.96 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमधील वैशिष्ट्ये, उत्तम परफॉर्मन्स आणि   परवडणाऱ्या किंमतीमुळे अनेक देशातील आणि विदेशातील ग्राहक ही कार विकत घेण्यासाठी आकर्षित होतात.

Web Title: Maruti suzuki alto is also popular abroad exports increased by more than 900 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 06:34 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
1

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स
2

Maruti Grand Vitara चा PHANTOM BLAQ Edition सादर, मिळणार एकदम खास फीचर्स

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू
3

6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी
4

मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.