
फोटो सौजन्य: iStock
भारतात अशा अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच कार्सची विक्री होत असते. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीच्या अनेक कार्स भारतात सुपरहिट ठरल्या आहेत. नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, अशातच कंपनीची एक कार मार्केटमध्ये फ्लॉप ठरली आहे. एवढेच नव्हे तर मागील 3 महिन्यात या कारचे एकही युनिट विकले गेलेले नाही. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
काही मारुती सुझुकीच्या डीलर्सकडे अजूनही लक्झरी सेडान Ciaz चा स्टॉक आहे. कंपनीने एप्रिल 2025 मध्ये सियाझ कायमची बंद केली. मात्र, गेल्या तीन महिन्यांत उर्वरित स्टॉकचा एकही युनिट विकला गेलेला नाही. म्हणूनच आता उर्वरित स्टॉक क्लिअर करण्यासाठी, कंपनी या कारवर 40000 ची सूट देत आहे. ही सूट उर्वरित सर्व सियाझ व्हेरिएंटवर उपलब्ध असेल. त्याच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमती 9.09 लाख ते 11.89 लाखांपर्यंत आहेत. ही कार होंडा सिटी, ह्युंदाई व्हर्ना, स्कोडा स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन व्हर्सोशी स्पर्धा करते.
Hyundai Creta चा Hybrid व्हर्जनमध्ये लाँच होणार, किती असेल किंमत? जाणून घ्या
सियाझमध्ये 1.5 -लिटर पेट्रोल इंजिन असेल जे 103 बीएचपी आणि 138 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मॅन्युअल व्हर्जनसाठी 20.65 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हर्जनसाठी 20.04 किमी/लीटर मायलेज देते. ही कार तीन नवीन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल: काळ्या रूफसह पर्ल मेटॅलिक ओप्युलेंट रेड, काळ्या रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रँडियर ग्रे आणि काळ्या रूफसह डिग्निटी ब्राउन.
फेस्टिव्ह सिझन असून देखील ‘या’ ऑटो कंपनीच्या नशिबात दुष्काळाच! 61 टक्के विक्री घसरून थेट…
सियाझमध्ये आता 20 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. हिल-होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) हे फीचर्स आता सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड स्वरूपात मिळतील.
कारमध्ये ड्युअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स, तसेच इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सहित अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अशी सेफ्टी फीचर्स उपलब्ध असतील. कंपनीचा दावा आहे की या अपग्रेडनंतर प्रवासी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहतील.