फोटो सौजन्य: gemini
दिवाळीच्या मुहूर्तावर नेहमीच भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खरेदी विक्री होत असते. त्यातही भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये या सिझनमध्ये बाईक आणि स्कूटरची दमदार विक्री होत असते. नुकतेच ऑक्टोबर 2025 चा महिना टू व्हीलर कंपन्यांसाठी खास ठरला आहे. याचे कारण म्हणजे विक्रीत झालेली मोठी वाढ. मात्र, Ola Electric साठी हा महिना इतका खास ठरला नाही.
ऑक्टोबरमध्ये Ather Energy ने 28,101 युनिट्सची विक्री करून 72.95% वाढ नोंदवली, तर ओला इलेक्ट्रिकचा महिना निराशाजनक राहिला. ओलाची विक्री 61.68% ने घसरून 16,036 युनिट्सवर आली. डिलिव्हरी विलंब आणि सर्व्हिस नेटवर्कच्या अभावामुळे ग्राहकांचा विश्वास कमी झाला.
Moto Morini च्या बाईक्सच्या किंमतीत मोठी वाढ, आता द्यावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे
दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात नवीन बाईक आणि स्कूटर खरेदी केल्या. या काळात कंपन्यांच्या शोरूम विक्रीने विक्रमी पातळी गाठली. शिवाय, केंद्र सरकारने अलिकडेच जीएसटी दरात कपात केल्याचाही थेट परिणाम बाजारावर झाला. दुचाकींच्या कमी झालेल्या किमती आणि सुलभ फायनान्स योजनांमुळे ग्राहकांनी नवीन वाहने खरेदी करण्यात रस दाखवला. परिणामी, ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 31,49,846 दुचाकी विकल्या गेल्या, जे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर 2024 पेक्षा 51.76% जास्त आहे.
ऑक्टोबरमध्ये हिरो मोटोकॉर्पने इतर सर्व कंपन्यांना मागे टाकत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. कंपनीने एकूण 9,94,787 युनिट्स विकले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 72.20% वाढ आहे. ग्रामीण बाजारपेठेत हिरोची मजबूत उपस्थिती आणि स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डिलक्स सारख्या बाईक्सची लोकप्रियता हे याच्या यशाचे प्रमुख घटक होते. हिरोने या महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे.
इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब
Honda Motorcycle and Scooter India ने ऑक्टोबरमध्ये अपवादात्मक चांगली कामगिरी केली. कंपनीने 8,21,976 युनिट्स विकल्या, जी वर्षानुवर्षे 47.78% वाढ आहे. होंडा अॅक्टिव्हा आणि सीबी शाइन सारख्या मॉडेल्सच्या जोरदार मागणीमुळे कंपनी बळकट झाली. आता, होंडा इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये देखील विस्तार करत आहे, ज्यामुळे येत्या काही महिन्यांत तिची विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.






