फोटो सौजन्य: Gemini
ह्युंदाई क्रेटा ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. विशेष म्हणजे ही एसयूव्ही आता हायब्रिड व्हर्जनमध्ये येणार आहे. माहितीनुसार, क्रेटा हायब्रिड 2027 मध्ये लाँच होणार आहे. ह्युंदाई क्रेटा ही आधीच भारतातील सर्वात लोकप्रिय मिड साइझ एसयूव्ही आहे. यामुळे हायब्रिड व्हर्जनमुळे कारप्रेमींमध्ये असा वाढला आहे. हे वाहन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या हायब्रिड एसयूव्हींशी थेट स्पर्धा करेल.
फेस्टिव्ह सिझन असून देखील ‘या’ ऑटो कंपनीच्या नशिबात दुष्काळाच! 61 टक्के विक्री घसरून थेट…
ह्युंदाईची पुढील जनरेशनची क्रेटा 2017 मध्ये लाँच केली जाईल, ज्यामध्ये हायब्रिड पॉवरट्रेन पर्याय असेल. कंपनीने अलिकडेच झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत पुष्टी केली की ती 2030 पर्यंत आठ नवीन हायब्रिड कार लाँच करेल आणि क्रेटा हायब्रिड ही त्यापैकी पहिली असेल.
Hyundai Creta Hybrid ची अपेक्षित किंमत सुमारे 20 लाख रुपये पासून सुरू होऊ शकते. ही किंमत सध्याच्या क्रेटाच्या टॉप व्हेरिएंटच्या जवळ असेल. या प्राइस रेंजमुळे ही कार उत्कृष्ट मायलेज आणि नवीन तंत्रज्ञानासह SUV घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम ठरेल.
Hyundai Creta Hybrid चे डिझाइन अधिक फ्यूचरिस्टिक आणि प्रीमियम असेल. यात मोठा पॅरामेट्रिक पॅटर्न ग्रिल कनेक्टेड LED DRLs सह, स्लिम LED हेडलॅम्प्स, वर्टिकल फॉग लॅम्प्स, 18-इंच अलॉय व्हील्स, फ्लश डोर हँडल्स, स्लोपिंग रूफलाइन आणि कनेक्टेड LED टेललाइट्स असे आधुनिक एलिमेंट्स असतील.
Hyundai Creta Hybrid मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळतील. त्यात समाविष्ट आहे:






