Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

मारुती सुझुकीने हंसलपूर आणि मानेसर प्लांटमधून रेल्वेने 10 लाखांहून जास्त वाहने रवाना करत मोठा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या एकूण रेल्वे डिस्पॅचमध्ये या दोन सुविधांचा वाटा तब्बल 70% आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 07:37 PM
मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीने हंसलपूर आणि मानेसर प्लांटमधून रेल्वेने 10 लाखांहून जास्त वाहने रवाना केली.
  • आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 31 ऑगस्टपर्यंत या दोन साइडिंगमधून 3 लाखांहून जास्त वाहने डिस्पॅच झाली.
  • आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत रेल्वे डिस्पॅचचा वाटा 35% करण्याचे मारुती सुझुकीचे लक्ष्य आहे.
Maruti Suzuki ने आपल्या वाहन वाहतुकीत रेल्वे वाहतुकीचा वापर वाढवत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गुजरातमधील हंसलपूर आणि हरियाणातील मानेसर येथील प्लांटमध्ये उभारलेल्या इन-प्लांट रेल्वे साइडिंगमधून कंपनीने एकत्रितपणे 10 लाखांहून जास्त वाहनांची वाहतूक केली आहे. यापैकी हंसलपूर प्लांटमधून सुमारे 7.9 लाख, तर मानेसरमधून सुमारे 2.1 लाख वाहनांची थेट डिस्पॅच करण्यात आली आहे.

हंसलपूर येथील रेल्वे साइडिंग मार्च 2023 मध्ये सुरू झाली, तर मानेसरमधील सुविधा जून 2025 मध्ये कार्यान्वित झाली. या दोन्ही ठिकाणांहून 10 लाख वाहनांचा टप्पा 3 वर्षे आणि 5 महिन्यांत गाठण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 31 ऑगस्टपर्यंत या दोन साइडिंगमधून 3 लाखांहून जास्त वाहनांची वाहतूक झाली आहे. कंपनीच्या एकूण रेल्वे डिस्पॅचपैकी सुमारे 70% हिस्सा या दोन्ही सुविधांचा आहे.

फ्रॉन्क्स ते ग्रँड विटारा! लवकरच येणार मारुतीच्या 5 Facelift Cars; पाहा कोणती बनेल तुमची फेवरेट!

मारुती सुझुकीच्या लॉजिस्टिक्समध्ये रेल्वेचे महत्त्व गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये कंपनीच्या वाहन वाहतुकीपैकी फक्त 5% वाहतूक रेल्वेने होत होती. हीच टक्केवारी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 26.5% पर्यंत पोहोचली. आता कंपनीने आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून 35% वाहन डिस्पॅच करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

रेल्वेचा वापर वाढवल्यामुळे कारखान्यात तयार झालेली वाहने बाहेरील लोडिंग टर्मिनलपर्यंत ट्रकने नेण्याची गरज कमी होते. त्यामुळे ट्रकची वाहतूक, इंधनाचा वापर आणि ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. आर्थिक वर्ष 2014-15 पासून मारुती सुझुकीने रेल्वेमार्गे एकूण 33 लाखांहून जास्त वाहनांची वाहतूक केली आहे. यातील 10 लाख वाहने थेट इन-प्लांट साइडिंगमधून रवाना झाली आहेत.

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

ही रेल्वे साइडिंग पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने आता हरियाणातील खारखोडा प्लांटसाठीही स्वतंत्र इन-प्लांट रेल्वे साइडिंगची योजना आखली आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या वाहन डिस्पॅचमध्ये रेल्वेचा वाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Maruti suzuki crosses ten lakh railway vehicle dispatches auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • indian raiway
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
1

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
2

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
3

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
4

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.