
फोटो सौजन्य: @MSArenaOfficial (X.com)
भारतीय मार्केटमध्ये विविध कार्स ऑफर केल्या जातात. यातही अनेक ग्राहक आपल्या सोयीनुसार आवडती कार निवडत असतात. जसे की जॉईंट फॅमिली असल्यास सर्वात पहिले प्राधान्य 7 सीटर कारला दिले जाते. मार्केटमध्ये अनेक उत्तम 7 सीटर कार ज्यांना ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका कारने जून 2025 मध्ये पुन्हा एकदा टॉपचे स्थान मिळवले आहे.
भारतीय मार्केटमध्ये 7-सीटर सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगा अजूनही वर्चस्व गाजवत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये, Maruti Suzuki Ertiga पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विक्री होणारी 7-सीटर कार ठरली आहे. तसेच, या काळात मारुती सुझुकी एर्टिगाच्या विक्रीत वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी एर्टिगाला एकूण 14,151 नवीन ग्राहक मिळाले. भारतीय मार्केटमध्ये, मारुती एर्टिगाची एक्सएल-शोरूम किंमत 8.96 लाख रुपयांपासून ते टॉप मॉडेलमध्ये 13.26 लाख रुपयांपर्यंत आहे.
ग्राहकांनी Bajaj च्या ‘या’ बाईककडे फिरवली पाठ ! चक्क लाँच झाल्याच्या 2 वर्षातच बंद केली विक्री
विक्रीच्या या यादीत महिंद्रा स्कॉर्पिओ दुसऱ्या क्रमांकावर होती. या काळात महिंद्रा स्कॉर्पिओने एकूण 12,740 कार विकल्या, ज्यात वार्षिक 4 टक्के वाढ झाली. तर टोयोटा इनोव्हा या विक्रीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. या काळात टोयोटा इनोव्हाने एकूण 3,802 कार विकल्या, ज्यामध्ये वार्षिक 6 टक्के घट झाली. याशिवाय, किया कॅरेन्स विक्रीच्या या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. या काळात किया कॅरेन्सने एकूण 7,921 कार विकल्या, ज्यात वार्षिक 54 टक्के वाढ झाली.
दुसरीकडे, विक्रीच्या यादीत महिंद्रा बोलेरो पाचव्या स्थानावर होती. या काळात महिंद्रा बोलेरोने एकूण 7,478 कार विकल्या, ज्यात वार्षिक 2 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय, महिंद्रा XUV 700 विक्रीच्या या यादीत सहाव्या स्थानावर होती. या काळात महिंद्रा XUV 700 ने एकूण 6,198 कार विकल्या, ज्यात वार्षिक आधारवर 5 टक्क्यांची वाढ झाली. तर टोयोटा फॉर्च्युनर विक्रीच्या या यादीत सातव्या स्थानावर होती. टोयोटा फॉर्च्युनरचे एकूण 2,743 युनिट्स विकले आहे, ज्यात वार्षिक आधारावर 3 टक्क्यांची वाढ झाली.
महिंद्रातर्फे XUV 3XO REVX सिरीज लाँच, प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार परफॉर्मन्स
विक्रीच्या यादीत मारुती सुझुकी XL6 आठव्या स्थानावर होती. या कालावधीत, या कारचे एकूण 2,011 कार विकल्या, ज्यात वार्षिक 39 टक्के घट झाली. तर टोयोटा रुमियन नवव्या स्थानावर असून टोयोटा रुमियनने एकूण 1,415 कार विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 10 टक्के घट झाली. याशिवाय, टाटा सफारी विक्रीच्या या यादीत दहाव्या स्थानावर होती. या कालावधीत टाटा सफारीने एकूण 922 कार विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 34 टक्के घट झाली.