Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ

सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकीने तब्बल 2,36,013 वाहनांची विक्री केली आणि विक्रीत 24% वाढ नोंदवली. पण या कामगिरीत सर्वात मोठा वाटा कोणत्या सेगमेंटचा होता? Utility Vehicles ची विक्री तब्बल 62% वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 05:19 PM
Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये 2,36,013 वाहनांची विक्री करत एकूण विक्रीत 24% वाढ नोंदवली आहे.
  • Utility Vehicle सेगमेंटमध्ये 62% वाढ झाली असून 78,911 युनिट्सची विक्री करण्यात आली.
  • एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान कंपनीची एकूण विक्री 28% वाढून 13,79,378 युनिट्स झाली.
मारुती सुझुकीने सप्टेंबर 2026 मध्ये एकूण 2,36,013 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,89,665 वाहनांची विक्री केली होती. त्यामुळे यंदा कंपनीच्या एकूण विक्रीत 24% वाढ झाली आहे. देशांतर्गत विक्रीसोबत एक्सपोर्टमध्येही वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसते.

कंपनीची देशांतर्गत पॅसेंजर व्हेईकल विक्री सप्टेंबरमध्ये 1,81,838 युनिट्सवर पोहोचली, जी मागच्या वर्षी 1,32,820 युनिट्स होती. म्हणजेच या सेगमेंटमध्ये 37% वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय Toyota सारख्या इतर OEM कंपन्यांना 6,542 वाहनांचा पुरवठा करण्यात आला.

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

SUV आणि Utility Vehicle ची मोठी झेप

मारुती सुझुकीच्या विक्रीमध्ये Utility Vehicle सेगमेंटने सर्वात जास्त लक्ष वेधले. Brezza, Ertiga, e Vitara, Fronx, Grand Vitara, Invicto, Jimny, Victoris आणि XL6 या मॉडेल्सची मिळून 78,911 युनिट्स विक्री झाली. मागच्या वर्षी हा आकडा 48,695 होता. म्हणजेच या सेगमेंटमध्ये तब्बल 62% वाढ झाली आहे.

दुसरीकडे Alto, Baleno, Celerio, Ciaz, Dzire, Ignis, S-Presso, Swift आणि WagonR या पॅसेंजर कार्सची एकत्रित विक्री 91,887 युनिट्स झाली. मागच्या वर्षीच्या 74,090 युनिट्सच्या तुलनेत यात 24% वाढ झाली. Eeco ची विक्रीही 10,035 वरून वाढून 11,040 युनिट्स झाली.

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु

एक्सपोर्टमध्येही वाढ

सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकीने 44,219 वाहनांचा एक्सपोर्ट केला. मागच्या वर्षी 42,204 वाहनांच्या तुलनेत ही 5% वाढ आहे. Super Carry ची विक्रीदेखील 2,891 वरून वाढून 3,414 युनिट्स झाली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2026 या पहिल्या 6 महिन्यांत कंपनीची एकूण विक्री 13,79,378 युनिट्सवर पोहोचली. मागच्या आर्थिक वर्षातील 10,78,735 युनिट्सच्या तुलनेत ही 28% वाढ आहे. या कालावधीत देशांतर्गत पॅसेंजर व्हेईकल विक्री 36% वाढून 10,80,240 युनिट्स झाली. Utility Vehicle सेगमेंटची विक्रीही 4,55,692 युनिट्सवर पोहोचली असून, या सेगमेंटची वाढ कंपनीच्या एकूण कामगिरीत महत्त्वाची ठरत आहे.

Web Title: Maruti suzuki september 2026 sales rise utility vehicles growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु
1

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज
2

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय
3

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा
4

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.