(फोटो सौजन्य-AI एआय)
नवीन स्विफ्ट CNG AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7.92 लाख ठेवण्यात आली आहे. डिझायर CNG AMT ची किंमत ₹8.53 लाख, तर बलेनो CNG AMT ची किंमत ₹8.32 लाख आहे. कंपनीने लाँचवेळी जाहीर केलेल्या या किमती विशेष फेस्टिव्ह आणि इंट्रोडक्टरी किमती आहेत. त्यामुळे भविष्यात त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
Maruti Suzuki : मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट
मायलेजमध्ये डिझायर आघाडीवर
या तिन्ही कारच्या CNG कार्यक्षमतेत डिझायर आघाडीवर आहे. डिझायर CNG AMT 36.47 km/kg मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्विफ्ट CNG AMTचे दावा केलेले मायलेज 35.34 km/kg, तर बलेनो CNG AMTचे 34.47 km/kg आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जास्त मायलेज आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगचा आराम अशी दुहेरी गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
CNG सोबत AMTचा फायदा
AMT गिअरबॉक्समुळे विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच आणि गिअर बदलण्याचा त्रास कमी होतो. मारुती सुझुकीने CNG सिस्टिममध्ये IGS फंक्शनचा वापर करून इंधन कार्यक्षमता सुधारण्यावरही भर दिला आहे. या नव्या पर्यायामुळे CNG कारच्या वापराचा अनुभव अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.
मारुती सुझुकीकडे देशातील मोठ्या फॅक्टरी-फिटेड S-CNG पोर्टफोलिओपैकी एक आहे. वॅगनआर, सेलेरिओ, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, फ्रॉन्क्स, ब्रेझा, अर्टिगा आणि XL6 यांसारख्या कारमध्ये CNG पर्याय उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने सुमारे 7.46 लाख CNG कार विकल्या, जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 22% जास्त आहे. आता स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोमध्ये AMT जोडल्याने CNG ग्राहकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.






