Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप

मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत 56.09% वाढ झाली असून, एकूण 3,21,111 गाड्यांची विक्री झाली. फ्रॉन्क्सने पहिले स्थान कायम ठेवले, पण व्हिक्टोरिसने तब्बल 1,581.78% वाढ नोंदवत ग्रँड व्हिटारालाही मागे टाकले. ई व्हिटाराच्या विक्रीकडेही आता लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 29, 2026 | 04:08 PM
मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत पहिल्या सहामाहीत 56.09% वाढ, एकूण 3,21,111 युनिट्सची विक्री नोंदवली गेली.
  • फ्रॉन्क्सने 1,10,135 युनिट्ससह पहिले स्थान कायम ठेवले, तर व्हिक्टोरिसने 72,012 युनिट्सची विक्री केली.
  • ई व्हिटाराच्या 10,051 युनिट्सची विक्री झाली, तर ब्रेझाच्या विक्रीत 5.17% घट नोंदवण्यात आली.

भारतात SUV गाड्यांची क्रेझ वाढत असताना मारुती सुझुकीने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत विक्रीचा बराच मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या फ्रॉन्क्स, ब्रेझा, व्हिक्टोरिस, ग्रँड व्हिटारा, ई व्हिटारा आणि जिम्नी या 6 SUV मॉडेल्सची मिळून 3,21,111 युनिट्स विकली गेली. मागच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत हा आकडा 2,05,727 युनिट्स होता. त्यामुळे कंपनीच्या SUV विक्रीत वर्षागणिक 56.09% वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीत फ्रॉन्क्स आणि व्हिक्टोरिसचा मोठा पार्ट मोठा राहिला.

फ्रॉन्क्स विक्रीत पहिल्या क्रमांकावर

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने पहिल्या सहा महिन्यात 1,10,135 युनिट्सची सेल करत कंपनीच्या SUV लिस्टमध्ये पहिले स्थान कायम ठेवले. मागच्या वर्षी याच कालावधीत 76,805 युनिट्सची विक्री झाली होती. यंदा तिच्या विक्रीत 43.39% वाढ झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारुती सुझुकी ब्रेझाच्या 80,516 युनिट्सची विक्री झाली. पण ब्रेझाच्या सेलमध्ये मागच्या वर्षीच्या 84,902 युनिट्सच्या तुलनेत 5.17% घट झाली. अलीकडे मिळालेल्या अपडेटनंतरही ब्रेझाच्या विक्रीत ही घसरण दिसून आली.

मारुती सुझुकीने एक्स्पोर्ट केल्या 50,000 पेक्षा जास्त EV कार! e Vitara जवळपास 50 देशांमध्ये दाखल

व्हिक्टोरिसची मोठी झेप; ग्रँड व्हिटारालाही फायदा

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसने या कालावधीत सर्वाधिक वाढ नोंदवली. तिची विक्री 4,282 युनिट्सवरून थेट 72,012 युनिट्सपर्यंत पोहोचली. म्हणजेच 1,581.78% वाढ झाली. सप्टेंबर 2025 मध्ये सादर झालेल्या या 5-सीटर SUV ला पूर्ण सहामाहीचा विक्री कालावधी मिळाल्यामुळे या आकड्यावर परिणाम झाला. व्हिक्टोरिसने ग्रँड व्हिटारालाही मागे टाकले. मारुती सुझुकी ग्रँड व्हिटाराच्या 45,176 युनिट्सची विक्री झाली, जी मागच्या वर्षीच्या 36,993 युनिट्सपेक्षा 22.12% जास्त आहे.

ई व्हिटाराची इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये एन्ट्री

मारुती सुझुकी ई व्हिटारा ही कंपनीची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत तिची 10,051 युनिट्स विकली गेली. या इलेक्ट्रिक SUV साठी कंपनीने 500 किमीपेक्षा जास्त रेंजचा दावा केला आहे. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या मॉडेलकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकी जिम्नीच्या 3,221 युनिट्सची विक्री झाली. मागच्या वर्षी हा आकडा 2,745 होता, त्यामुळे 17.34% वाढ झाली. एकूण आकडे पाहता, फ्रॉन्क्स आणि व्हिक्टोरिसने कंपनीच्या SUV विक्रीला मोठी चालना दिली असून, इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये ई व्हिटाराची पुढील वाटचाल कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

छोट्या कारचे मार्केट संपलेले नाही! भारत केवळ SUV गाड्यांचा बाजार नाही; मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांचे विधान

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: मारुती सुझुकीने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत किती SUV विकल्या?

उत्तर: कंपनीने फ्रॉन्क्स, ब्रेझा, व्हिक्टोरिस, ग्रँड व्हिटारा, ई व्हिटारा आणि जिम्नी या 6 मॉडेल्सच्या मिळून 3,21,111 युनिट्स विकल्या.

प्रश्न 2: मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी SUV कोणती ठरली?

उत्तर: मारुती सुझुकी फ्रॉन्क्स 1,10,135 युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली. तिच्या विक्रीत वर्षागणिक 43.39% वाढ झाली.

प्रश्न 3: मारुती सुझुकी ई व्हिटाराची विक्री किती झाली आणि तिची रेंज किती आहे?

उत्तर: ई व्हिटाराच्या 10,051 युनिट्सची विक्री झाली. कंपनीच्या दाव्यानुसार, या इलेक्ट्रिक SUV ची रेंज एका चार्जमध्ये 500 किमीपेक्षा जास्त आहे.

Web Title: Maruti suzuki suv sales rise fronx victoris e vitara auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV cars

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीने एक्स्पोर्ट केल्या 50,000 पेक्षा जास्त EV कार! e Vitara जवळपास 50 देशांमध्ये दाखल
1

मारुती सुझुकीने एक्स्पोर्ट केल्या 50,000 पेक्षा जास्त EV कार! e Vitara जवळपास 50 देशांमध्ये दाखल

आता 95% इथेनॉल आणि 5% टक्केच पेट्रोल? भारतात E100 फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा मार्ग बेलगाम! सरकारने नियम बदलले, जनतेची पाचावर धारण
2

आता 95% इथेनॉल आणि 5% टक्केच पेट्रोल? भारतात E100 फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा मार्ग बेलगाम! सरकारने नियम बदलले, जनतेची पाचावर धारण

न्यू केटीएम 200 ड्यूक लाँच! फक्त ₹1,552 रुपयांनी महाग; पण मिळणार क्विकशिफ्टर आणि राइडिंग मोड्सही
3

न्यू केटीएम 200 ड्यूक लाँच! फक्त ₹1,552 रुपयांनी महाग; पण मिळणार क्विकशिफ्टर आणि राइडिंग मोड्सही

वाहन उत्सर्जन नियमांमध्ये बदल करण्याची ऑटो कंपन्यांची मागणी; मारुती सुझुकीचे सीईओ काय म्हणाले?
4

वाहन उत्सर्जन नियमांमध्ये बदल करण्याची ऑटो कंपन्यांची मागणी; मारुती सुझुकीचे सीईओ काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.