Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यू केटीएम 200 ड्यूक लाँच! फक्त ₹1,552 रुपयांनी महाग; पण मिळणार क्विकशिफ्टर आणि राइडिंग मोड्सही

केटीएमने 2026 200 ड्यूकमध्ये नवीन रंगांसह इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर अपडेट्स दिले आहेत. 25 PS पॉवर कायम ठेवत कंपनीने क्विकशिफ्टर, रेन मोड, स्ट्रीट मोड आणि क्रॉल असिस्ट यांसारखी फीचर्स जोडली आहेत. पण या बदलांमुळे रोजच्या प्रवासात आणि रायडिंगच्या अनुभवात किती फरक पडेल?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 29, 2026 | 09:11 AM
न्यू केटीएम 200 ड्यूक लाँच! फक्त ₹1,552 रुपयांनी महाग; पण मिळणार क्विकशिफ्टर आणि राइडिंग मोड्सही
Follow Us
Follow Us:
  • नवीन केटीएम 200 ड्यूकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ₹2,07,140 असून, जुन्या मॉडेलपेक्षा फक्त ₹1,552 जास्त आहे.
  • बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, राइड-बाय-वायर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि 2 रायडिंग मोड्स ही नवी वैशिष्ट्ये आहेत.
  • 43 mm WP फोर्क्स, 320 mm फ्रंट डिस्क आणि 150-सेक्शन मागील टायर देण्यात आला आहे.

केटीएमने भारतात 2026 मॉडेलची नवीन KTM 200 DUKE ऑफीशली लाँच केली आहे. या बाईकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ₹2,07,140 ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नव्या मॉडेलसाठी जुन्या किमतीपेक्षा फक्त ₹1,552 जास्त द्यावे लागणार आहेत. पण या स्वस्त किमतीवाढीत कंपनीने बाईकमध्ये भरपूर इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर अपडेट्स दिले आहेत. त्यामुळे 200cc स्पोर्टी बाईक घेण्याचा विचार करणाऱ्या रायडर्ससाठी हे मॉडेल अगदी नादखुळा चर्चेचा विषय ठरू शकते.

नवीन कलरमुळे लूकला वेगळी ओळख

नवीन केटीएम 200 ड्यूकमध्ये लिक्विड कार्बन आणि स्लेट ग्रे असे 2 नवीन रंग दिले आहेत. लिक्विड कार्बनमध्ये बाईकला पूर्ण काळा लूक मिळतो, तर स्लेट ग्रे रंग वेगळी छटा देतो. कंपनीने बाईकची ओळखीची स्ट्रीटफायटर स्टाइल कायम ठेवली आहे. त्यामुळे डिझाइनमध्ये मोठे बदल न करता नवीन कलर्सच्या मदतीने लूक फ्रेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आता बाईकमध्ये बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर

या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर. याच्या मदतीने क्लचचा वापर न करता गिअर वरच्या आणि खालच्या बाजूला बदलता येतात. वेगाने बाईक चालवताना आणि गिअर बदलताना रायडरला याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय, ट्रेडीशनल मेकॅनिकल थ्रॉटलऐवजी राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यामुळे रायडरला बाईकच्या रिफ्लेक्सवर कंट्रोल ठेवण्यासाठी जास्त सुविधा मिळतात.

दिवाळीत खरेदी करा या 5 परफॉर्मन्स बाईक्स! बजाज ते यामाहा, किंमत 1.60 लाखांपासून

स्ट्रीट आणि रेन मोड्ससह ट्रॅक्शन कंट्रोल

नवीन मॉडेलमध्ये स्ट्रीट आणि रेन असे 2 रायडिंग मोड्स दिले आहेत. स्ट्रीट मोड रोजच्या प्रवासासाठी, तर रेन मोड कमी ग्रिप असलेल्या रस्त्यांवर सावधपणे रायडिंग करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्शन कंट्रोलही स्टँडर्ड फीचर म्हणून मिळतो. हे फंक्शन्स TFT डिस्प्लेमधून कंट्रोल करता येतात. कमी स्पीडमधील वाहतुकीत मदत करण्यासाठी क्रॉल असिस्ट फीचरचाही समावेश करण्यात आला आहे.

सस्पेन्शन, ब्रेक आणि टायरमध्ये बदल

हार्डवेअरमध्ये पुढच्या बाजूला 43 mm WP अपसाइड-डाउन फोर्क्स आणि 320 mm फ्रंट ब्रेक डिस्क देण्यात आली आहे. मागील टायर आता 150-सेक्शनचा आहे. या बदलांमुळे बाईकच्या हाताळणीचा अनुभव आणि रस्त्यावरील स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. इंजिनची पॉवर 25 PS इतकीच ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, नवीन केटीएम 200 ड्यूकमध्ये इंजिनपेक्षा फीचर्स आणि रायडिंग अनुभव सुधारण्यावर कंपनीने जास्त भर दिला आहे.

2027 Triumph Tiger 1200 भारतात मार्च 2027 मध्ये येणार! मिळणार 158 PS पॉवर आणि रडार फीचर्स

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: नवीन केटीएम 200 ड्यूकची किंमत किती आहे?

उत्तर: 2026 केटीएम 200 ड्यूकची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹2,07,140 आहे.

प्रश्न 2: नवीन केटीएम 200 ड्यूकमध्ये कोणती नवीन फीचर्स मिळतात?

उत्तर: बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, राइड-बाय-वायर, स्ट्रीट आणि रेन राइडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रॉल असिस्ट आणि TFT डिस्प्ले यांचा समावेश आहे.

प्रश्न 3: नवीन केटीएम 200 ड्यूकची इंजिन पॉवर किती आहे?

उत्तर: या बाईकमध्ये 25 PS पॉवर देणारे इंजिन कायम ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: 2026 ktm 200 duke launched india price features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

वाहन उत्सर्जन नियमांमध्ये बदल करण्याची ऑटो कंपन्यांची मागणी; मारुती सुझुकीचे सीईओ काय म्हणाले?
1

वाहन उत्सर्जन नियमांमध्ये बदल करण्याची ऑटो कंपन्यांची मागणी; मारुती सुझुकीचे सीईओ काय म्हणाले?

छोट्या कारचे मार्केट संपलेले नाही! भारत केवळ SUV गाड्यांचा बाजार नाही; मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांचे विधान
2

छोट्या कारचे मार्केट संपलेले नाही! भारत केवळ SUV गाड्यांचा बाजार नाही; मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांचे विधान

दिवाळीत खरेदी करा या 5 परफॉर्मन्स बाईक्स! बजाज ते यामाहा, किंमत 1.60 लाखांपासून
3

दिवाळीत खरेदी करा या 5 परफॉर्मन्स बाईक्स! बजाज ते यामाहा, किंमत 1.60 लाखांपासून

बजाज ट्रेकर अ‍ॅडव्हेंचर बाईक 2027 मध्ये येणार? 250cc इंजिन, TFT स्क्रीन आणि स्पोक व्हील्सची खासियत!
4

बजाज ट्रेकर अ‍ॅडव्हेंचर बाईक 2027 मध्ये येणार? 250cc इंजिन, TFT स्क्रीन आणि स्पोक व्हील्सची खासियत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.