फोटो सौजन्य- Official Website
भारतीय ऑटो बाजारपेठेत मारुती सुझुकीचेच कायम वर्चस्व राहिले आहे. कार कोणत्याही प्रकारातील असो सर्वात जास्त कार विक्री मारुती कंपनीकडूनच होते. 2024 ऑगस्ट महिन्याच्या आलेल्या अहवालानुसार कंपनीने या महिन्यात देशांतर्गत बाजारात एकूण 1,45,000 पेक्षा जास्त कार विकल्या आहेत. मात्र या विक्रमी कार विक्रीमध्ये मारुती सुझुकीसाठी एक कारची विक्री डोकेदुखी ठरली आहे. जी गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी विक्री होत आहे.
मारुतीच्या Ciaz कारबद्दल आम्ही बोलत आहोत, गेल्या महिन्यात या कारचे केवळ 707 युनिट्स विक्री झाले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये मारुती Ciaz ला एकूण ८४९ ग्राहक मिळाले. तर वार्षिक कालावधीची तुलना करता मारुती सुझुकी सियाझच्या विक्रीत 16.72 टक्क्यांची घट झाली आहे. या कारवर मारुती सुझुकीने बंपर डिस्काउंट देऊनही, Ciaz च्या विक्रीत अनेक महिन्यांपासून घट होत आहे.
फोटो सौजन्य- Official website
Maruti Ciaz इंजिन, पॉवर
Ciaz ची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख ते 12.29 लाख रुपयांपर्यंत आहे. Ciaz मध्ये, 1.5-लिटर पेट्रोल इंजिन असून जे 105 bhp पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते. ही कार 20.65 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. तुम्ही ही कार 7 मोनोटोन आणि टोन रंगांमध्ये खरेदी करू शकता.
कारची वैशिष्ट्ये
कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto च्या समर्थनासह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्वयंचलित हवामान नियंत्रण, स्वयंचलित एलईडी हेडलाइट्स, पुश-बटण स्टार्टसह पॅसिव्ह कीलेस एंट्री आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड-सीट अँकरेज, रियर पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे. मारुती सियाझ ही इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल-असिस्टसह येते. बाजारात मारुती सियाझची स्पर्धा Honda City, Hyundai Verna, Volkswagen Virtus इत्यांदीशी आहे.
कारमध्ये नवीन अपडेटेड मॉडेल नाही, जुने इंजिन
मारुती सियाझ लाँच होऊन 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात कंपनीने या कारमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. या काळात ह्युंदाई वेर्ना आणि होंडा सिटीच्या तीन अपडेटेड कार आल्या आहेत. Ciaz च्या कमी विक्रीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्याचे जुने झालेले इंजिन. कंपनीने आपल्या इंजिनमध्ये बऱ्याच काळापासून कोणतेही अपडेट दिलेले नाही. पूर्वीप्रमाणेच, हे 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येत आहे, तर स्पर्धक कार हायब्रिड इंजिन आणि ADAS सारख्या प्रगत तंत्रज्ञानासह सादर केल्या आहेत. अशा अनेक कारणांमुळे ही कार सेदान प्रकारात सर्वात स्वस्त कार असूनही विकली जात नाही आहे.