फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)
भारतात उत्पादित होणारी मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, e-Vitara, आता केवळ भारतीय ग्राहकांपुरती मर्यादित राहणार नसून ती जपानच्या मार्केटमध्येही निर्यात केली जाणार आहे. खरंतर, ही सुझुकीची पहिली ईव्ही असेल जी भारतात उत्पादित केली जाईल आणि जगभरात पाठवली जाणार आहे. मारुतीची ही एसयूव्ही सप्टेंबर 2025 पूर्वी भारतात लाँच केली जाऊ शकते.
जपानमध्ये विकली जाणारी ही चौथी मेड इन इंडिया सुझुकी कार असेल. यापूर्वी फ्रॉन्क्स , बलेनो आणि जिमनी 5-डोअर देखील भारतातून निर्यात करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे जिमनी कारला जपानमध्ये इतकी मागणी आहे की या कारचा वेटिंग पिरियड दोन वर्षांपर्यंत गेला आहे.
e-Vitara ला 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट तासाचे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतील. या बॅटरीद्वारे, ही एसयूव्ही एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.
पुन्हा एकदा Honda Civic मार्केटमध्ये कमबॅक करणार? Volkswagen Golf GTI ला मिळेल जोरदार टक्कर
मारुती सुझुकी ई-विटारा पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय असतील. सिग्मा व्हेरियंट 49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येईल ज्याची अंदाजे किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, तर डेल्टा व्हेरियंट 49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 19.5 लाख रुपयांना उपलब्ध असेल. झेटा व्हेरियंट दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल (49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 21 लाख रुपये आणि 61 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 22.5 लाख रुपये). त्याच वेळी, अल्फा व्हेरियंट हा टॉप ट्रिम असेल, जो 61 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 24 लाख रुपयांच्या अंदाजे किंमतीत उपलब्ध असेल. झेटा हा एकमेव व्हेरियंट असेल ज्यामध्ये दोन्ही बॅटरी पर्याय उपलब्ध असतील.
ई-विटारा ही या सेगमेंटमधील सर्वात फ्यूचरिसिटिक ईव्ही म्हणता येईल कारण त्यात अनेक प्रीमियम आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यात 10.1 -इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जो वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो. त्यासोबत 10.25 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील उपलब्ध असेल. ऑडिओ अनुभवासाठी, त्यात इन्फिनिटी बाय हरमनची साउंड सिस्टम आहे. याशिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्नो सारखे ड्राइव्ह मोड देखील समाविष्ट आहेत.
पुन्हा एकदा Honda Civic मार्केटमध्ये कमबॅक करणार? Volkswagen Golf GTI ला मिळेल जोरदार टक्कर
ई-विटारा केवळ भारतातच नाही तर यूके आणि नेदरलँड्ससारख्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील लाँच केली जाईल. विशेष म्हणजे सुझुकी या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर 10 वर्षांची वॉरंटी देत आहे, जी आतापर्यंत कोणत्याही सुझुकी मॉडेलवर देण्यात आली नव्हती.