Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन

भारतीय बाजारात अनेक कार लोकप्रिय आहेत. आज आपण अशाच एका उत्तम आणि सर्वाधिक लोकप्रिय कारबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 06:37 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Suzuki Wagon R ही देशातील एक लोकप्रिय कार
  • भारतात आतापर्यंत 35 लाखांपेक्षा जास्त युनिट्सचे उत्पादन
  • जाणून घ्या कारचा संपूर्ण प्रवास
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांनी मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. यातही कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार ऑफर करत असतात. ज्यामुळे काही कार वर्षानुवर्षे मार्केटमध्ये सुपरहिट ठरतात. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R.

मारुती सुझुकी वॅगनआर ही भारतीय हॅचबॅक सेगमेंटमधील काही मोजक्या कारपैकी एक आहे ज्या ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यातच या कारने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतातील वॅगनआरचे एकूण उत्पादन 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त झाले आहे.

1999 पासून आजपर्यंत मारुती वॅगनआरचा प्रवास

डिसेंबर 1999 मध्ये भारतात वॅगनआर लाँच करण्यात आली. तेव्हापासून, कंपनीने हे मॉडेल बदलत्या काळानुसार सतत अपडेट केले आहे. 2004 मध्ये या कारला ड्युओ एलपीजी व्हेरिएंट, 2010 मध्ये दुसरी जनरेशन आणि सीएनजी व्हेरिएंट, 2015 मध्ये ऑटो गिअर शिफ्ट, ड्युअल एअरबॅग्ज आणि एबीएस, 2017 मध्ये व्हीएक्सआय+ व्हेरिएंट, 2019 मध्ये तिसरी जनरेशन आणि 2022 मध्ये मॉडेलमध्ये किरकोळ बदल केले. आतापर्यंत, वॅगनआर तीन जनरेशन्समध्ये आली आहे. या कारचे बॉडी फॉरमॅट राखताना, फीचर्स आणि कम्प्लायन्समध्ये सतत अपडेट्स होत गेले आहेत.

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार

कंपनी काय म्हणाली?

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO हिसाशी ताकेउची म्हणाले, “ही कामगिरी केवळ उत्पादनातील एक महत्त्वाचा टप्पा नाही तर पिढ्यानपिढ्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. 25 वर्षांनंतरही एखादी कार इतकी लोकप्रिय राहणे दुर्मिळ आहे. वॅगनआर कालांतराने तंत्रज्ञान आणि फीचर्समध्ये सुधारणा करून विकसित करत याची मूळ ओळख कायम ठेवली आहे.”

भारतापासून जगभर प्रवास

WagonR ची सुरुवात सप्टेंबर 1993 मध्ये जपानमध्ये झाली. भारतात लाँच झाल्यानंतर याची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली आणि आज ही कार 75 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत WagonR ची जागतिक विक्री 1 कोटी युनिट्सपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी सुमारे एक-तृतीयांश वाटा भारताचा आहे.

मल्टी-फ्युएल आणि ट्रान्समिशन पर्याय

WagonR च्या यशामागे विविध फ्युएल आणि ट्रान्समिशन पर्यायांची महत्त्वाची भूमिका आहे. LPG, CNG तसेच 2015 मध्ये सादर करण्यात आलेला ऑटो गिअर शिफ्ट पर्याय यामुळे ही कार एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी अधिक सुलभ ठरली. सुरक्षेच्या बाबतीतही WagonR सातत्याने अपडेट होत गेली आहे. सुरुवातीला ड्युअल एअरबॅग आणि ABS देण्यात आले होते, तर आता सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग, ABS with EBD आणि ESP स्टँडर्ड स्वरूपात मिळतात.

‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स

प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान

WagonR पाचव्या जनरेशनच्या HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हा प्लॅटफॉर्म वजन नियंत्रण, मजबूत स्ट्रक्चर आणि उत्पादन कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरतो. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कारमध्ये 7-इंच (17.78 सेमी) SmartPlay Studio टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, Apple CarPlay, Android Auto, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि व्हॉइस कमांड सपोर्ट देण्यात आला आहे.

भारतामधील मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्क

भारतामध्ये WagonR चे उत्पादन हरियाणातील गुरुग्राम आणि मानेसर येथील प्लांट्समध्ये होते. जागतिक पातळीवर ही कार जपान, हंगेरी आणि इंडोनेशिया येथेही तयार केली जाते. यामुळे पुरवठा साखळी मजबूत राहते आणि आंतरराष्ट्रीय मागणी प्रभावीपणे पूर्ण करता येते.

Web Title: Maruti suzuki wagon r more than 35 lakh units production completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार
1

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार

देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन
2

देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन

ही ऑफर सोडू नका! डिसेंबर 2025 मध्ये Kia च्या Cars वर 3.65 लाखांपर्यंतचे Discount
3

ही ऑफर सोडू नका! डिसेंबर 2025 मध्ये Kia च्या Cars वर 3.65 लाखांपर्यंतचे Discount

कशाला सनरूफसाठी जास्त पैसे मोजताय! ‘या’ Sunroof Cars वर एकदा नजर फिरवा
4

कशाला सनरूफसाठी जास्त पैसे मोजताय! ‘या’ Sunroof Cars वर एकदा नजर फिरवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.