फोटो सौजन्य: Gemini
भारतीय बाजारात सध्या अनेक किफायतशीर कार्स Level-2 ADAS सह उपलब्ध आहेत. या कार्स केवळ सुरक्षितच नाहीत, तर कमी बजेटमध्ये आधुनिक आणि हाय-टेक फीचर्सही देतात. अशाच काही किफायतशीर ADAS कार्सची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
या यादीतील सर्वात स्वस्त Level-2 ADAS देणारी कार म्हणजे Honda Amaze. याची सुरुवातीची किंमत 9.15 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर i-VTEC इंजिन देण्यात आले असून ते 89 bhp पॉवर आणि सुमारे 18.65 kmpl मायलेज देते. Honda Sensing ADAS सूटमध्ये टक्कर टाळण्याची सिस्टम, Adaptive Cruise Control, Lane Keep Assist आणि Auto High Beam यांसारखी फीचर्स मिळतात. फॅमिली कार म्हणून ती अधिक उपयुक्त ठरते कारण यात 416 लीटर बूट स्पेस, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत.
Mahindra XUV 3XO ही कार ADAS सह 12.17 लाख रुपयांत उपलब्ध आहे. यात 130 PS पॉवर देणारे 1.2-लीटर टर्बो पेट्रोल किंवा 115 bhp डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो, जो सुमारे 20 kmpl मायलेज देतो. यातील ADAS फीचर्समध्ये Forward Collision Mitigation, Adaptive Cruise Control आणि Smart Pilot Assist यांचा समावेश आहे.
कशाला सनरूफसाठी जास्त पैसे मोजताय! ‘या’ Sunroof Cars वर एकदा नजर फिरवा
Tata Nexon ही कार तिच्या मजबुतीसाठी आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाते. Level-2 ADAS सह तिची किंमत 12.16 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 118 bhp पॉवर देणारे इंजिन असून 17–24 kmpl पर्यंत मायलेज मिळते. नेक्सॉनमध्ये Forward Collision Warning, Autonomous Braking आणि Lane Keep Assist यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
Honda City ही कार तिच्या स्मूथ राइड क्वालिटीसाठी ओळखली जाते. Level-2 ADAS सह या कारची सुरुवातीची किंमत 12.69 लाख रुपये आहे. यात 1.5-लीटर इंजिन देण्यात आले असून ते 120 bhp पॉवर जनरेट करते. CVT ट्रान्समिशनसह ही कार सुमारे 18.4 kmpl मायलेज देते.
ग्राहकांच्या लाडक्या Tata Punch चा Facelift मॉडेल कधी होणार लाँच? कसे असतील फीचर्स आणि डिझाइन?
Hyundai Verna ही या यादीतील सर्वात पावरफुल कार असून ती 160 bhp टर्बो इंजिन आणि 20.6 kmpl मायलेजसह येते. याची किंमत 14.35 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये Blind Spot Monitoring, Lane Keep Assist आणि Forward Collision Avoidance यांसारखी Level-2 ADAS फीचर्स देण्यात आली आहेत. 528 लीटर बूट स्पेस, Bose साउंड सिस्टम आणि Ventilated सीट्स यामुळे Verna एक अत्यंत प्रीमियम सेडान ठरते. तसेच, याचे 5-स्टार GNCAP रेटिंग या कारच्या सुरक्षिततेला आणखी बळकटी देते.






