फोटो सौजन्य: YouTube
सेप्टेंबरचा महिना सुरु झाला आहे आणि त्या सोबतच सणासुदीचा काळ लवकरच चालू होणार आहे. याच सणासुदीच्या काळात अनेक कंपनीज आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळया ऑफर्स लाँच करत असतात. तसेच ग्राहक सुद्धा या मुहूर्तावर भरभरून शॉपिंग करत असतात. कोणी नवनवीन गोष्टी घरी आणतात तर कोणी नवीन कपडे एकमेकांना भेट देत असतात.
या शुभ मुहूर्तावर अनेक जण आपली हक्काची कार विकत घेत असतात. जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या मुहूर्तावर एका चांगल्या ऑफरसह कार विकत घेण्याचा विचार करताय. तर मारुती सुझुकी या भारतातील आघाडीच्या कार निर्माती कंपनीने आपल्या Alt0 K10 आणि SPresso कार्स स्वस्त केल्या आहेत. कंपनीने त्यांच्या किमती कमी करण्यामागचे कारण विक्रीतील वाढ असू शकते. चला जाणून घेऊया, या कार्सच्या किंमती किती कमी झाल्या आहेत.
मारुती सुझुकीने S-Presso LXI पेट्रोलच्या किमतीत 2,000 रुपयांनी कपात केली आहे. यासह, Alto K10 VXI पेट्रोलची किंमत 6,500 रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे आता ग्राहक अल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपयांच्या दरम्यान खरेदी करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही तुमच्या घरी एस-प्रेसो ला 4.26 लाख ते 6.11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणू शकता. या सर्व किंमती तुमच्या जवळील एक्स-शोरूमनुसार बदलू शकतात.
छोट्या हॅचबॅक कारमध्ये, ग्राहकांना फीचर्स जाणीव आरामशीर जागेसाठी तडजोड करावी लागते. अशा परिस्थितीत, लोकं फायनान्सच्या माध्यमातून महागडी कार घेण्याचा आग्रह धरताना दिसतात. त्यामुळेच छोट्या कार्सच्या मागणीत घट होताना दिसत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, ऑल्टो आणि एस-प्रेसोसह कंपनीच्या मिनी सेगमेंट कारची विक्री गेल्या महिन्यात 12,209 युनिट्सच्या तुलनेत 10,648 युनिट्सवर घसरली. कदाचित याच कारणांमुळे कंपनीने या कार्स सणासुदीच्या खास मुहूर्तावर स्वस्त केल्या आहेत.