फोटो सौजन्य- X
आजच्या काळात कोणत्याही वाहनातील सुरक्षा घटक हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. ग्राहक वाहन खरेदी करताना कारची किंमत, वैशिष्ट्ये, इंजिन क्षमतेसह सुरक्षेसंबंधी बांबींनाही महत्व देत आहेत. त्यामुळे कार उत्पादकांनाही सुरक्षा घटकांवर कार्य करावे लागत आहे. कार कोणत्याही प्रकारातील असूदे त्यातील सुरक्षा घटक हे त्या कारमध्ये आकर्षकता प्रदान करत नसले तरी प्रवास करताना आपण या कारमध्ये सुरक्षित आहोत ही भावना वाहनचालक आणि प्रवास करणाऱ्यांमध्ये निर्माण करते. त्यामुळे प्रवासाचा आनंदही घेता यतो.
मारुती सुझुकीचा सुरक्षिततेसंबंधी वैशिष्ट्ये
मारुती सुझुकी ही भारतामध्ये सर्वात जास्त कार विक्री करणाऱ्या कंपनीकडून केवळ आपल्या प्रीमियम कार्सवरच नव्हे तर आपल्या बजेट कारच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जात आहे. आपल्या परवडणाऱ्या कारच्या सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल टाकत कंपनीने Alto आणि S-Presso मध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने आता या दोन्ही कारमध्ये स्टॅडंर्ड म्हणून इलेक्ट्राॅनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) समाविष्ट केला आहे. आता हे सुरक्षा वैशिष्ट्य या दोन्ही कारच्या सर्व बेस टू टॉप मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या नवीन फीचरनंतरही कंपनीने किमती वाढवलेल्या नाहीत.
ईएसपी म्हणजे काय?
इलेक्ट्राॅनिक स्टेबिलिटी प्रोग्राममुळे वाहनाची स्थिरता सुधारण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होतो. आव्हानात्मक आणि निसरड्या रस्त्याच्या परिस्थितीत वाहन घसरण्यापासून रोखण्यासाठी ESP अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) यांच्या संयोगाने कार्य करते.
कारमध्ये आधीपासून उपलब्ध असलेली सुरक्षा वैशिष्ट्ये
Alto K10 आणि S-Presso या मारुती सुझुकीच्या हार्टटेक्ट (HEARTECT) प्लॅटफॉर्मवर आधारित एंट्री-लेव्हल किफायतशीर छोट्या कार आहेत. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, EBD सह ABS, कोलॅप्सिबल स्टीयरिंग कॉलम आणि इंजिन इमोबिलायझर यांसारखी काही सुरक्षा वैशिष्ट्ये या वाहनांमध्ये उपलब्ध आहेत.
Alto K10 आणि S-Presso या कारच्या अगोदरच्या मॉडेल्सना GNCAP क्रॅश सुरक्षा चाचण्यांमध्ये अतिशय कमी गुण मिळाले आहेत. आता मात्र कंपनीने जोडलेल्या फिचरमुळे वाहन सुरक्षेसंबंधी अधिक चांगले झाले आहे. या अधिक सुरक्षा उपकरणे, मजबुतीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाची भर घातल्याने कारचा सुरक्षाविषयक दर्जा नक्कीच सुधारणार आहे आणि त्याच्या सर्वाधिक उपयोग ग्राहकांना होणार आहे.