फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम कार्स लाँच होत आहे. त्यातही इलेक्ट्रिक कार्सची संख्या ही मोठी आहे. पण असे जरी असले तरी आजही काही अशा कार्स आहेत ज्यांची विक्री काही कमी होताना दिसत नाही आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी जिंकलेला ग्राहकांचा विश्वास. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, जी मार्केटमध्ये 25 वर्षांपासून आपले स्थान बनवून आहे. ही कार मोस्ट पॉपुलर कारच्या यादीत सुद्धा समाविष्ट आहे.
मारुती सुझुकी देशात अनेक उत्तम कार्स ऑफर करत आहे. यातीलच एक कार म्हणजे Maruti WagonR. ग्राहक आजही कंपनीच्या या कारवर डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. याचे कारण म्हणजे कारचा परफॉर्मन्स, मायलेज आणि स्वस्त किंमत.
Maruti च्या ‘या’ कारवर 2.15 लाख रुपये बचत करण्याची संधी, आजच करा बुकिंग
गेल्या अनेक वर्षांपासून मारुती वॅगनआर ही लोकांची पहिली पसंती राहिली आहे. ही कार 25 वर्षांपूर्वी भारतीय बाजारात लाँच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत बाजारात या कारची मागणी कमी झालेली नाही. मारुतीने ही कार १९९९ मध्ये भारतीय बाजारात लाँच केली आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये, ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होती.
यावेळी देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब टाटा मोटर्सच्या नावावर गेला. ४० वर्षांत पहिल्यांदाच टाटा मोटर्सची कार या यादीत अव्वल स्थानावर आहे. २०२४ मध्ये टाटा पंच ही सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. गेल्या वर्षी या कारच्या 2.02 लाख युनिट्स विकल्या गेल्या. तर २५ वर्षांनंतरही मारुती वॅगनआर या यादीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार बनली. २०२४ मध्ये या मारुती कारच्या 1.90 लाख युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
जितेंद्र EV ने लाँच केली Yunik इलेक्ट्रिक स्कूटर, ११८ km रेंजसह अनेक हटके फीचर्स
मारुती वॅगनआर ही लोकप्रिय कार आहे, याचे कारण म्हणजे या कारची किंमत. ही कार सामान्य लोकांच्या बजेटमध्ये आहे. त्याचवेळी, या मॉडेलला व्हॅल्यू फॉर मनी कार देखील म्हणता येईल, कारण या किंमतीत मारुती कंपनी चांगले मायलेज देण्याचा दावा करते.
मारुती वॅगनआरची किंमत आणि मायलेज, या दोन्ही गोष्टी लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा आहेत. दिल्लीतील मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5,54,500 रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7,20,500 रुपयांपर्यंत जाते.
मारुती वॅगनआर बाजारात ९ कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ही कार K12N 4-सिलेंडर इंजिनद्वारे चालवली जाते. या इंजिनसह, ही कार 6,000 आरपीएमवर 66 किलोवॅट पॉवर निर्माण करते आणि 4,400 आरपीएमवर 113 एनएम टॉर्क जनरेट करते. या वाहनात सेमी-ऑटोमॅटिक (AGS) ट्रान्समिशन बसवले आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 24.35 किमी प्रति लिटर आणि एजीएस ट्रान्समिशनसह 25.19 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा करते. ही कार सीएनजीमध्ये देखील समाविष्ट आहे. १-लिटर सीएनजी वॅगनआर असलेली मारुती वॅगनआर 33.47 किमी/किलो मायलेज देते.