
फोटो सौजन्य: Gemini
मारुती सुझुकी इंडियाच्या डिसेंबरमधील विक्रीचे रिपोर्ट जाहीर केले आहेत. डिसेंबर 2025 च्या तुलनेत कंपनीने सर्व सेगमेंटमध्ये चांगली विक्री नोंदवली आहे. मात्र, एका कारने कंपनीला निराश केले आहे. कंपनीची प्रीमियम सेडान, Ciaz , विक्रीत अपयशी ठरली आहे. Ciaz ची शून्य विक्रीचा हा सलग पाचवा महिना आहे. विशेष म्हणजे, कंपनीने एप्रिल 2025 मध्ये सियाझ बंद केली. मात्र, काही नेक्सा डीलर्सकडे अजूनही स्टॉक शिल्लक आहे, जो संपलेला नाही.
आजपासून ‘या’ 7 कंपन्यांच्या कार झाल्या महाग, लिस्टमध्ये स्वस्त कारचा देखील समावेश
खरं तर, डीलर्स दरमहा सियाझवर डिस्काउंट देत आहेत, ज्यामुळे ती 50000 पर्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.41 लाख रुपये आहे. मात्र, काही सियाझचे मॉडेल आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. मॉडेल वर्ष देखील बदलले असल्याने, नवीन वर्षात उर्वरित सियाझ युनिट्स कशी विकली जातील हे पाहणे बाकी आहे. अशा परिस्थितीत, कंपनी लक्षणीय सवलत देऊ शकते.
मारुती सुझुकीने फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या लक्झरी सेडान सियाझ मध्ये नवीन सेफ्टी अपडेट्स केले होते. यासोबतच कंपनीने या कारमध्ये 3 नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय सादर केले आहेत. ड्युअल-टोन पर्यायांमध्ये ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ऑप्युलेंट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रँड्युअर ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राऊन हे रंग उपलब्ध आहेत. नवीन व्हेरिएंट मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Tata Punch EV vs Citroen eC3: कोणती इलेक्ट्रिक कार खरेदी करणे तुमच्यासाठी जास्त बेस्ट?
इंजिनच्या बाबतीत कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. सियाझमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 103bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, सियाझचे मॅन्युअल व्हर्जन 20.65 km/l तर ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 km/l इतके मायलेज देते.