Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम

प्रसिद्ध लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज-बेंझने उत्तर प्रदेशात आपला विस्तार वाढवत एका प्रमुख शहरात अत्याधुनिक शोरूम सुरू केले आहे. या नवीन शोरूममधील जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा आणि ईव्ही चार्जिंगच्या सोयींमुळे लक्झरी ऑटोमोबाईल मोठे बदल होणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 18, 2026 | 07:20 AM
Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम
Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझने टी अँड टी मोटर्सच्या सहकार्याने लखनऊमध्ये ९,००० स्क्वेअर फूटचे नवीन लक्झरी शोरूम लाँच केले.
  • या आधुनिक शोरूममध्ये ग्राहक आणि ईव्ही गाड्यांसाठी १८० kW चा हाय-स्पीड डीसी फास्ट चार्जर बसवण्यात आला आहे.
  • या नवीन विस्तारामुळे उत्तर प्रदेशातील मर्सिडीज-बेंझच्या एकूण लक्झरी टचपॉइंट्सची संख्या आता १० वर पोहोचली आहे.

जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया‘ने उत्तर प्रदेशातील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी लखनऊ येथे ‘टी अँड टी मोटर्स’च्या सहकार्याने नवीन भव्य लक्झरी शोरूमचे उद्घाटन केले आहे. कंपनीच्या ‘गो टू कस्टमर’ या रणनीतीचा हा एक भाग असून, यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमधील ग्राहकांना प्रीमियम खरेदीचा अनुभव आणि ईव्ही चार्जिंग सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

या नवीन शोरूममुळे आता उत्तर प्रदेशातील मर्सिडीज-बेंझच्या लक्झरी टचपॉइंट्सची संख्या १० वर पोहोचली आहे. हे टचपॉइंट्स लखनऊ, नोएडा, गाझियाबाद, आग्रा, कानपूर आणि वाराणसी येथे पसरलेले आहेत. संपूर्ण भारतात ६० हून अधिक शहरांमध्ये मर्सिडीज-बेंझची १५० हून अधिक लक्झरी शोरूम्स कार्यरत आहेत.

९,००० स्क्वेअर फूट पसरलेले अत्याधुनिक शोरूम आणि १८० kW फास्ट चार्जर

लखनऊमधील या नवीन शोरूमचे क्षेत्रफळ सुमारे ९,००० स्क्वेअर फूट. ग्राहकांना डिजिटल आणि वैयक्तिक खरेदीचा अनुभव देण्यासाठी हे डिझाइन करण्यात आले आहे. या शोरूममध्ये एकाच वेळी चार लक्झरी गाड्या प्रदर्शित केल्या जाऊ शकतात.

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ

या नवीन शोरूमची प्रमुख वैशिष्ट्ये:-

  • टॉप-एंड व्हेईकल्स लाउंज: हाय-एंड आणि मेबेक मॉडेल्ससाठी खास लाउंज.
  • ईव्ही चार्जिंग सुविधा: इलेक्ट्रिक वाहनांसाठी १८० kW DC फास्ट चार्जर आणि दोन चार्जिंग बे.
  • कस्टमर कन्सल्टेशन एरिया: ग्राहकांशी संवादासाठी प्रायव्हेट आणि सेमी-प्रायव्हेट जागा.
  • लाइफस्टाइल बुटीक: मर्सिडीज-बेंझच्या अधिकृत मर्चेंडाइजचे प्रदर्शन.
  • विशेष डिलिव्हरी एरिया: चावी हस्तांतरणासाठी स्वतंत्र ‘की प्रेझेंटर’ बे.
उत्तर प्रदेश आणि लखनऊ लक्झरी कारसाठी महत्त्वाचे केंद्र

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंग व्हाईस प्रेसिडेंट ब्रेंडन सिसिंग यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश ही कंपनीसाठी एक महत्त्वाची उदयोन्मुख बाजारपेठ आहे. लखनऊमधील ग्राहकांचा प्रीमियम गाड्यांकडे वाढणारा कल पाहता येथे मोठी संधी उपलब्ध आहे. अवघ्या पाच महिन्यांत हे शोरूम तयार करण्यात आले असून, यात ८८ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांसाठी उघडतील नवीन दरवाजे, उत्तर प्रदेशात लॉजिस्टिक्स क्लस्टर्सची तयारी सुरू

टी अँड टी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहन तलवार यांनी सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून ते मर्सिडीज-बेंझचे रिटेल पार्टनर आहेत. या नवीन विस्तारामुळे उत्तर प्रदेशातील वाहनप्रेमींना लक्झरी कार मालकीचा एक नवीन अनुभव मिळेल.

मेट्रो शहरांच्या पलीकडे लक्झरी मार्केटचा विस्तार

पूर्वी लक्झरी कारची विक्री केवळ दिल्ली, मुंबई किंवा बंगळुरू यांसारख्या मेट्रो शहरांपुरती मर्यादित होती. मात्र, आता लखनऊ, कानपूर, जयपूर आणि कोची यांसारख्या शहरांमध्ये श्रीमंत वर्ग आणि प्रीमियम गाड्यांची मागणी वेगाने वाढत आहे. मर्सिडीज-बेंझने आपल्या ‘रिटेल ऑफ द फ्युचर’ मॉडेलअंतर्गत आतापर्यंत भारतात ८०,००० हून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. लखनऊमधील १८० kW फास्ट चार्जरची उभारणी हे दर्शवते की, कंपनी या भागात केवळ पेट्रोल-डिझेल लक्झरी कारच नाही तर हाय-एंड इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Web Title: Mercedes benz expands network with lucknow showroom auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:20 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mercedes

संबंधित बातम्या

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
1

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
2

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
3

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
4

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.