फोटो सौजन्य: mgselect (Instagram)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या मागणीत सुद्धा बदल पाहायला मिळत आहे. सध्या, इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.
आता ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी MG मोटर्स सुद्धा MG M9 ही इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच करणार आहे.
ही कार कोणत्या तारखेला लाँच केली जाईल? त्यात कोणत्या प्रकारची फीचर्स आणि रेंज दिले जाऊ शकते? ती कोणत्या किंमतीला लाँच केली जाऊ शकते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज
कार उत्पादक कंपनी एमजी मोटर्सने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की ही कार जुलै 2025 मध्ये भारतीय बाजारात त्यांची प्रीमियम इलेक्ट्रिक एमपीव्ही एमजी एम9 लाँच करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै 2025 रोजी भारतात ही कार औपचारिकपणे लाँच केले जाईल.
कंपनीने सोशल मीडियावर एक टीझर जारी करून या कारच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. या टीझरमध्ये लिहिले आहे की The experience is unmatched. The presence, undeniable. The final word?
Coming 21.07.2025 Stay tuned. काही सेकंदांचा व्हिडिओ देखील त्याच्यासोबत शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर ही कार 21 जुलै 2025 रोजी लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tesla Model Y Vs BYD Sealion 7: किंमत, फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती इलेक्ट्रिक कार आहे बेस्ट?
या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील. यामध्ये ब्राऊन -सिल्व्हर-काळ्या रंगाच्या थीमसह इंटिरिअर असेल. यासोबतच, यात सॉफ्ट टच डॅशबोर्ड, वेगवेगळे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, अँबियंट लाइट्स, लेदरेट सीट्स, क्लायमेट कंट्रोल, दोन सिंगल पेन सनरूफ आणि पॅनोरॅमिक सनरूफ पर्याय, दुसऱ्या रांगेत दोन इन्फोटेनमेंट स्क्रीन असतील. या कारच्या दुसऱ्या रांगेच्या सीटमध्ये पायलट सीट्स देण्यात येतील.
याशिवाय, कारच्या एक्सटिरिअरमध्ये इलेक्ट्रिक स्लाइडिंग डोअर, एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, ट्रॅपेझॉइडल मेश फ्रंट ग्रिल, एलईडी टेल लाईट्स, 19 इंच अलॉय व्हील्स यांसारखे फीचर्स दिले जातील.
MG ने अद्याप त्याची बॅटरी, मोटर आणि रेंजबद्दल माहिती दिलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की त्यात 90kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. ज्यामुळे ही कार एका चार्जमध्ये 548 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. DC फास्ट चार्जरने ते फक्त 30 मिनिटांत 30 ते 80 टक्के चार्ज करता येते.
JSW MG M9 इलेक्ट्रिक MPV ची नेमकी किंमत त्याच्या लाँचिंगच्या वेळीच कळेल. मात्र, त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 ते 75 लाख रुपये असू शकते.