फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. सध्या ग्राहकांचा ओढा इलेक्ट्रिक कार्सकडे जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे.
भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लोक्रॉइय आहेत. यात पहिल्या क्रमांकावर MG Windsor Pro. प्रत्येक महिन्यात या कारच्या विक्रीत वाढ होत आहे. मात्र, आता जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार आहे.
भारतीय ऑटो बाजारात अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकणाऱ्या कंपन्या आहेत. MG Motors ही त्यातीलच एक. नुकतेच कंपनीने MG Windsor Pro ची किंमत वाढवली आहे. कंपनीने कोणत्या व्हेरिएंटची किंमत वाढवली आहे? आता ती कोणत्या किंमतीत उपलब्ध असेल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
बजेट तयार ठेवा ! Diwali 2025 पूर्वीच ‘या’ 5 धमाकेदार SUVs होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
वाहन उत्पादक कंपनी एमजी मोटर्सने विंडसर प्रोची किंमत वाढवली आहे. रिपोर्ट्सनुसार, याच्या फक्त एकाच व्हेरिएंटची किंमत वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार, विंडसर प्रोच्या टॉप व्हेरिएंट म्हणजेच Essense Pro ची किंमत 21 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, इतर कोणत्याही व्हेरिएंटच्या किंमतीत बदल करण्यात आलेला नाही.
किंमत वाढल्यानंतर, आता या कारची किंमत 18.31 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येणार आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अजूनही 14 लाख रुपये आहे. त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
मायलेजच्या बाबतीत ‘या’ 5 कारवर ग्राहक कधीच संशय घेत नाही, किंमत खिश्याला परवडणारी
कंपनीने या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. ड्युअल टोन इंटिरिअर, V2L आणि V2V देखील यात देण्यात आले आहेत. याशिवाय, अँबियंट लाईट, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, 15.6 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, चार ट्विटर, सब वूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लाकडी फिनिश, 604 लिटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना, फ्लश डोअर हँडल यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये कंपनीने 52.9 किलोवॅट प्रति तास क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी एका चार्जमध्ये 449 किलोमीटरपर्यंत चालवता येते. 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरने ती फक्त 50 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज करता येते. त्यात बसवलेली मोटर या कारला 136 पीएसची पॉवर आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क देते.