होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतात आजही नवीन बाईक विकत घेताना तिचा मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करता असतात. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात अनेक स्वस्तात मस्त बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. आता नुकतेच कंपनीने नवीन Shine 125 बाईक लाँच केली आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने अपडेटेड शाइन 125 लाँच केली आहे. ही नवीन बाईक आता OBD-2B प्रमाणित आहे. या बाईकला आगामी उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी अपडेटेड इंजिन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे.
तब्बल 4 लाख पॉइंटद्वारे ‘ही’ बलाढ्य कंपनी भारतातील EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देणार
नवीन 2025 होंडा शाइन 125 ची किंमत सुमारे 85000 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. हे ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक संपूर्ण भारतातील एचएमएसआय डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे.
नवीन शाईन 125 मध्ये 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर पीजीएम-फाय इंजिन आहे, जे आता ओबीडी२बी प्रमाणित आहे. हे इंजिन 7500 आरपीएम वर 7.93 किलोवॅट पॉवर आणि 6000 आरपीएम वर 11 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्यात आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे, जी इंधन कार्यक्षमता सुधारते.
ही बाईक आता नवीन कलर स्कीमसह एक नवीन रूप देण्यात आले आहे. ही बाईक सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये पर्ल इग्नियस ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, रेबेल रेड मेटॅलिक, डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू असे रंग समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, बाईकमध्ये आता 90 मिमी रुंद मागील टायर आहे, जे तिचे दृश्य आकर्षण आणि रस्त्यावर स्थिरता दोन्ही वाढवते.
‘या’ EV ने टाटाच्या कारचा उठवला बाजार ! मागील चार महिन्यात केली दमदार विक्री
नवीन शाईन १२५ मध्ये आता पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. जे रिअल-टाइम मायलेज, रेंज, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि इको इंडिकेटरसह अनेक माहिती देते. याव्यतिरिक्त, ही बाईक USB टाइप-सी चार्जिंग पोर्टने सुसज्ज आहे, ज्यामुळे रायडर्सना प्रवासात त्यांचे डिव्हाइस चार्ज करण्यास मदत होईल.
ओबीडी२बी शाइन 125 लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओटनी म्हणाले, “आम्हाला ओबीडी२बी-प्रमाणित शाइन 125 च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. २००६ मध्ये लाँच झाल्यापासून शाइन तिच्या श्रेणीमधील सर्वात लोकप्रिय मोटरसायकल राहिली आहे, जिने लाखो भारतीय ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. वर्षानुवर्षे या बाईकने कार्यक्षमता, आरामदायीपणा आणि विश्वसनीयतेसाठी सतत नवीन मापदंड स्थापित केले आहेत. आम्हाला अपग्रेडेड फीचर्स असलेली नवीन शाइन 125 लाँच करण्याचा आनंद होत आहे.”