तब्बल 4 लाख पॉइंटद्वारे 'ही' बलाढ्य कंपनी भारतातील EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देणार
भारतात ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात टाटा.ईव्ही नेहमी आघाडीवर राहिली आहे. विकासाच्या नव्या टप्प्याला चालना देताना ‘ओपन कोलॅबरेशन २.०’ मार्फत टाटा.ईव्ही भारताच्या ईव्ही चार्जिंग ईकोसिस्टमला वेग देत आहे. येत्या दोन वर्षांमध्ये चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त वाढवून 4 लाखांवर पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
हे साध्य करण्यासाठी 30 हजार नवीन सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याच्या उद्देशाने टाटा.ईव्ही प्रमुख चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्स (सीपीओज)सोबत आपला सहयोग अधिक दृढ करत आहे. ही चार्जिंग स्टेशन्स सर्व ईव्ही निर्माते आणि ब्रॅंड्सना समर्थन देतील. ज्यामुळे व्यापक उपलब्धता, सोय आणि सर्व ईव्ही यूझर्स, चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लानर्ससाठी परस्परांना लाभदायक अशा ईकोसिस्टमची खातरजमा होईल.सार्वजनिक, सामुदायिक आणि खाजगी / घरगुती चार्जर्सचे हे व्यापक आणि निर्बाध नेटवर्क उत्सर्जन-मुक्त गतीशीलतेची वाढती मागणी पूर्ण करेल, ईव्हीच्या अंगिकारास प्रोत्साहन देईल आणि हरित, शाश्वत भविष्याकडे वळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती देईल.
‘या’ EV ने टाटाच्या कारचा उठवला बाजार ! मागील चार महिन्यात केली दमदार विक्री
पहिल्या टप्प्यातील दोन वर्षांत ५०० टाटा.ईव्ही मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी टाटा.ईव्हीने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन सोबत सामंजस्य करार केले आहेत. हे चार्जर्स मुख्य शहरांत आणि महत्त्वाच्या महामार्गांवर स्थापित करण्यात येतील. टाटा.ईव्ही मेगा चार्जर्स सर्व ईव्हीसाठी खुली असतील पण टाटा.ईव्हीच्या ग्राहकांना तेथे प्रवेश आणि दराच्या बाबतीत प्राधान्य मिळेल. भागीदार सीपीओजद्वारा संचालित होणारी मेगा चार्जर्स सोयिस्कररित्या ट्रॅक करता येतील आणि आयआरए.ईव्ही अॅपच्या माध्यमातून सेवांचे पेमेंट एकाच वेळी करता येऊ शकेल ज्यामुळे विविध चार्जिंग अॅप डाउनलोड करण्याची गरज असणार नाही.
‘ओपन कोलॅबरेशन २.०’ च्या लाँचविषयी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनिजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा म्हणाले, “टाटा.ईव्ही सुरुवातीपासूनच भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये आघडीवर राहिली आहे. त्यांनी केवळ जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणली नाहीत, तर देशभरात एक मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील स्थापन केले. भारतात ईव्हीची जबरदस्त वृद्धी सक्षम करण्यासाठी आम्ही ‘ओपन कोलॅबरेशन २.०’ लाँच केले आहे. आघाडीच्या सीपीओजसोबत भागीदारी करून येत्या दोन वर्षांत चार्जिंग नेटवर्क 40 हजार पॉईंट्सपर्यंत विस्तारित करण्याचे आमचे ध्येय आहे.”
New Generation Creta मार्केटमध्ये राडा करणार, कधी होणार लाँच? चला जाणून घेऊया
२०१९ पासून सर्वात आधी सुरळीत खाजगी / घरगुती चार्जिंग सोल्यूशन्स दाखल करण्यासाठी टाटा समूहाच्या कंपन्यांशी भागीदारी करून आणि नंतर ईव्हीचा झटपट स्वीकार करणाऱ्या शहरात आणि शहराच्या आजूबाजूस सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करून टाटा.ईव्हीने सुरुवातीच्या काळातच ईव्हीचा स्वीकार करणाऱ्यांना महत्त्वाचा आधार आणि प्रोत्साहन प्रदान केले आहे.
टाटा.ईव्हीने आपले ‘खुल्या सहयोगा’चे फ्रेमवर्क २०२३ मध्ये लाँच केले आणि चार्ज पॉइंट ऑपरेटर्स तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी दृढ केली. या सहयोगाचा फोकस प्रामुख्याने लांबचे प्रवास सुरळीत होण्याची खातरजमा करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी आणि विशेषतः महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विस्तारित करण्यावर होता. परिणामी अवघ्या 15 महिन्यांत भारतातील चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त झाली आणि 18000 चार्जर्सच्या वर गेली. टाटा.ईव्हीच्या एकत्रित प्रभावामुळे 200 पेक्षा जास्त शहरांत 1.5 लाखापेक्षा जास्त खाजगी / घरगुती चार्जर्स, 2500 समुदाय चार्जर्स आणि टाटा डीलरशिप्सच्या ठिकाणी 750 चार्जर्स बसवण्यात आले.