फोटो सौजन्य: iStock
टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी सरकारने फास्टटॅग ही सुविधा चालू केली आहे. यानिमित्ताने भारत सरकारने कॅशलेस व्यवहारांकडे आपले पाऊल टाकले आहे. वेळोवेळी सरकारने फास्टटॅगची सुविधा नागरिकांसाठी सोपी आणि सोयीस्कर करण्यासाठी त्यात अनेकदा बदल केले आहे. आता सरकार अजून एक नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
भारतातील पहिली बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan अंबानींच्या दारात; किंमत जाणून थक्क व्हाल
भारत सरकार लवकरच FASTag बाबत एक नवीन नियम आणण्याची योजना आखत आहे. नवीन FASTag नियम लागू झाल्यानंतर लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. सतत फास्टटॅग रिचार्ज करण्यापेक्षा सरकार आता वार्षिक तसेच लाइफटाइम पास आणायच्या तयारीत आहे. यामुळे वारंवार FASTag रिचार्ज केल्याने टोल प्लाझाजवळ वाहनांच्या लांब रांगांपासूनही लोकांना दिलासा मिळेल. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की वार्षिक पास घेतल्याने लोकांना जास्त फायदा होईल की वारंवार FASTag रिचार्ज केल्याने. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सरकार वार्षिक आणि लाइफटाइम टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे. वार्षिक पाससाठी लोकांना फक्त 3000 रुपये द्यावे लागतील आणि लाइफटाइम टोल पाससाठी त्यांना 30000 रुपये एकदाच द्यावे लागतील, ज्यामुळे लोकांना 15 वर्षांसाठी टोल पास मिळेल.
Maruti Suzuki ची कार खरेदी करणार आहात? February 2025 मध्ये प्रीमियम कारवर लाखो रुपये वाचवाल
FASTag चा हा नवीन नियम लागू झाल्यानंतर, ज्यांना बहुतेक रोड ट्रिप करायला आवडते आणि ज्यांना त्यांच्या प्रायव्हेट कारने प्रवास करायला आवडते त्यांना याचे बरेच फायदे (FASTag benefits) मिळतील. अशा लोकांसाठी हा नियम फायदेशीर ठरणार आहे. खरंतर, जेव्हा तुम्ही कमीत कमी 200 किमी किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासावर जाता, तेव्हा 700-800 रुपये टोल म्हणून कापले जातात. जे वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी टोलचे भाडे खूपच महाग होते. जेव्हा हा नवीन नियम लागू होईल, तेव्हा फक्त 3000 रुपयांमध्ये एका वर्षासाठी टोल पास उपलब्ध असेल आणि खाजगी वाहन मालकांना टोल पाससह अनलिमिटेड प्रवेश मिळू शकेल. यामुळे त्यांना खूप फायदा होईल.
या FASTag नियमांच्या अंमलबजावणीनंतर, जे लोकं वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा त्यांच्या प्रायव्हेट वाहनातून प्रवास करतात, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. वर्षभरासाठी 3000 रुपयांचा टोल पास काढणे त्यांना महाग पडेल. अशा लोकांसाठी FASTag कार्ड दर महिन्याला रिचार्ज करणेच फायदेशीर ठरेल.
हा नवीन FASTag नियम लागू झाल्यानंतर, सरकारला टोल कनेक्शन बनवणे सोपे होईल. यासोबतच टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या लांब रांगांपासून लोकांना दिलासा मिळेल. तसेच लाइफटाइम टोल पास घेतल्यानंतर, लोकांना टोल प्लाझावर कधीही कर भरावा लागणार नाही.