फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानींकडे गाड्यांचा अफाट कलेक्शन आहे. विशेष बाब म्हणजे या कलेक्शनमध्ये आता वाढ झाली आहे. या कलेक्शनमध्ये नव्या कोऱ्या बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan ने एन्ट्री घेतली आहे. मुळात, अंबानींची ही नवीन कार फार चर्चेत आहे. या गाडीची चर्चा आहे ती म्हणजे या गाडीच्या अप्रतिम फीचर्समुळे. चला तर मग जाणून घेऊयात, अंबानींची नवीन कार बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan बद्दल विशेष बाबी:
ही खास तयार करण्यात आलेली Rolls-Royce Cullinan बुलेट आणि स्फोटकांच्या धोक्यांपासून सर्वोत्तम संरक्षण प्रदान करणारी एक उच्च श्रेणीची आर्मर्ड SUV आहे. महत्वाचे म्हणजे सुरक्षेसाठी या गाडीचे नाव प्रसिद्ध आहे. यासह ही कार आलिशान ड्रायव्हिंग अनुभव देखील देते. या गाडीमध्ये 6.75-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन आहे, जे उत्कृष्ट कार्यक्षमता देते. पाच जणांसाठी आरामदायी आसनव्यवस्था आणि लक्झरी इन्टिरियरसह ही गाडी परिपूर्ण आरामासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
Rolls-Royce Cullinan या कारच्या किमतीविषयी पाहिले तर ही गाडी ७.९९ कोटी या किमतीत उपल्बध आहे. परंतु, मुकेश अंबानी यांनी या गाडीला मॉडिफाय केले आहे. यामध्ये करण्यात आलेले मॉडिफिकेशन पाहता या गाडीची किंमत अंदाजे १३ कोटींपर्यंत असू शकते. परंतु, या गाडीसंदर्भात कोनतीही अधिकृत किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही आहे. काही दिवसांपूर्वी, मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीने Rolls-Royce Phantom Drophead Coupé खरेदी केली होती. आकाश त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बहीण इशा अंबानी तसेच पत्नीसह ही गाडी चालवताना दिसून आला होता. त्यावेळी ही आकर्षक कार फार चर्चेत होती. मुकेश अंबानी यांनी खरेदी केलेल्या बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinanचीही फार चर्चा होत आहे.
Automobili Ardent India च्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या बुलेटप्रूफ Cullinan ला आकर्षक सिल्व्हर फिनिश देण्यात आले आहे. या गाडीच्या मजबुत आर्मरमुळे केबिन, रूफ आणि फ्लोअरला उच्च क्षमतेच्या स्फोटांपासून संरक्षण मिळते. विंडशील्ड, खिडक्या, दरवाजे आणि इंधन टाकीसाठीही अतिरिक्त सुरक्षात्मक थर लावण्यात आले आहेत. याशिवाय, गाडीमध्ये मिलिटरी ग्रेड रन-फ्लॅट टायर्स आहेत, ज्यामध्ये सॉलिड पॉलीकार्बोनेट इन्सर्ट्स आहेत, जे पंक्चर झाल्यानंतरही गाडी कार्यरत राहण्याची क्षमता देतात.