फोटो सौजन्य: iStock
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी त्यांच्या नेक्सा डीलरशिपद्वारे काही सर्वोत्तम कार आणि एसयूव्ही ऑफर करते. जर तुम्ही या महिन्यात मारुती सुझुकीच्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीकडून कोणत्या कारवर किती सूट दिली जात आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
या महिन्यात मारुती नेक्सा द्वारे ऑफर केलेल्या ऑफ-रोडिंग एसयूव्ही जिमनीवर सर्वाधिक सूट दिली जात आहे. माहितीनुसार, या एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटवर 1.20 लाख रुपयांपासून ते 1.90 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त या कारच्या 2024 मॉडेल्सवर उपलब्ध आहे. याशिवाय, जर तुम्ही 2025 मध्ये बनलेली कार खरेदी केली तर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.75 लाख ते 14.80 लाख रुपयांपर्यंत आहे.
व्हिएतनामच्या ऑटो कंपनीचा भारतात जलवा, Tata Nano पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार करणार लाँच
मारुती त्यांच्या नेक्सा डीलरशिपद्वारे ग्रँड विटारा देखील ऑफर करते. कंपनी फेब्रुवारी महिन्यात या एसयूव्हीवर 1.65 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देत आहे. ही ऑफर त्यांच्या 2024 मॉडेल्सवर दिली जात आहे. याशिवाय, कंपनीकडून या महिन्यात 2025 च्या युनिट्सवर 1.10 लाख रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. या एसयूव्हीची किंमत 11.19 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी 19.९९ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
फेब्रुवारीत कंपनीची तिसरी एसयूव्ही फ्रॉन्क्स खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते. या एसयूव्हीवर 1.03 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ही ऑफर 2024 मध्ये बनवलेल्या एसयूव्हीच्या काही मॉडेल्सवर दिली जात आहे. याशिवाय, एसयूव्हीच्या 2025 मॉडेल्सवर जास्तीत जास्त 95 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत.
Zepto ला मानला बॉस ! iPhone नंतर आता चक्क करणार ‘या’ लक्झरी कंपनीच्या कारची डिलिव्हरी
मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे बलेनो देखील ऑफर करते. कंपनी या प्रीमियम हॅचबॅक कारवर 85 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देत आहे. ही ऑफर त्यांच्या 2024 मॉडेल्सवर उपलब्ध असेल. या महिन्यात, 2025 मॉडेल्सवर जास्तीत जास्त 55000 रुपयांच्या ऑफर दिल्या जात आहेत. मारुती बलेनोची किंमत 6.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 9.92 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.
इन्व्हिक्टो ही मारुतीची सर्वात महागडी कार म्हणून आणली जाते. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करणार असाल तर तुम्ही 3.15 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही बचत त्यांच्या 2024 मॉडेल्सवर केली जात आहे. या महिन्यात तुम्हाला 2025 मधील युनिट्सवर 2.5 लाख रुपयांच्या ऑफर दिल्या जात आहेत.
याव्यतिरिक्त, Maruti XL6, आणि Maruti Ciaz वर देखील कंपनीकडून दमदार ऑफर्स दिल्या जात आहे.