Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

नव्या मारुती ब्रेझाने अवघ्या सहा आठवड्यांत ६० हजारांहून अधिक बुकिंगचा टप्पा गाठत मोठा विक्रम सेट केला आहे. पावरफुल टर्बो इंजिन, आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम फीचर्समुळे ग्राहकांचा कल नेमका कशाकडे आहे? पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 01:39 PM
सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!
Follow Us
Follow Us:
  • नव्या मारुती ब्रेझाने लाँचनंतर अवघ्या सहा आठवड्यांत ६० हजारांहून जास्त बुकिंगचा विक्रम केला.
  • ब्रेझामध्ये १.०-लिटर टर्बो आणि १.५-लिटर पेट्रोलसह S-CNG इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे.
  • ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लायंड स्पॉट वॉर्निंग आणि प्रीमियम फीचर्समुळे ब्रेझा अधिक आकर्षक बनली आहे.
इंडियन ऑटोमोबाईल क्षेत्रातील अव्वल लेवलची कंपनी मारुती सुझुकीने आपल्या अपडेटेड ‘ब्रेझा’ कॉम्पॅक्ट SUV च्या जोरावर बाजारात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २४ जुलै २०२६ रोजी लाँच झालेल्या या नव्या ब्रेझाने फक्त सहा आठवड्यांत ६०,००० हून जास्त बुकिंग्जचा टप्पा पार केला आहे. या नव्या मॉडेलमध्ये पॉवरफुल १.०-लिटर टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन, आकर्षक डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

दमदार इंजिन पर्याय आणि मायलेज

  • टर्बो बूस्टरजेट: ९९७cc चे हे टर्बो-पेट्रोल इंजिन ११०.२ PS पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते. हे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. कंपनीच्या दाव्यानुसार हे इंजिन २०.४७ किमी/लिटरचे मायलेज देते. याची सुरुवातीची किंमत रु. ७,३९,९०० (एक्स-शोरूम) आहे.
  • K15C पेट्रोल इंजिन: १,४६२cc चे हे इंजिन १०३.०५ PS पॉवर आणि १३९ Nm टॉर्क देते. यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय अव्हेलेबल आहे. याचे मायलेज २१.०९ किमी/लिटर आहे.
  • S-CNG व्हेरियंट: १,४६२cc चे हे इंजिन CNG मोडमध्ये ८७.८ PS पॉवर आणि १२१.५ Nm टॉर्क जनरेट करते. अंडरबॉडी सीएनजी टँक लेआउटमुळे यात डिकीची बचत होते. हे मॉडेल २६.९ किमी/किग्रॅ इतके जबरदस्त मायलेज देते.
आकर्षक डिझाईन आणि नवीन रंग

नव्या ब्रेझाच्या बाह्य डिझाईनमध्ये स्मोक्ड क्रोम ग्रिल, मेटॅलिक ग्रे बुल-बार, नवीन प्रिसिजन-कट अलाय व्हील्स आणि ड्युअल-टोन साईड क्लेडिंग देण्यात आली आहे. ही गाडी ‘व्हिव्हेशिअस ऑरेंज’ आणि ‘लस्ट्रस बेज’ या नव्या रंगांसह एकूण आठ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

हाय-टेक केबिन आणि सुरक्षा फीचर्स

गाडीच्या आतील भागात ड्युअल-टोन डार्क ब्राऊन आणि ब्लॅक थीमसह १०.१-इंच स्मार्टप्ले प्रो X टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, ॲलेक्सा व्हॉईस असिस्टंट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ६४-कलर ॲम्बियंट लाइटिंग, Arkamys साउंड सिस्टम आणि वायरलेस चार्जर यांसारखे प्रीमियम फीचर्स आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने यात ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लायंड स्पॉट वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) यांसारखे प्रगत फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

Web Title: New maruti brezza crosses 60000 bookings six weeks auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.