फोटो सौजन्य: Social media
भारतात अशा अनेक कार्स आहेत ज्या आजही विक्रीच्या बाबतीत टॉपवर असतात. मग भले कितीही नवीन आणि अत्याधुनिक कार लाँच होउदे, ग्राहकांची मागणी त्याच कारसाठी जास्त असते. अशा अनेक कार्स आहेत ज्या आज भारतीय कार खरेदीदारांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक म्हणजे मारुती सुझुकीची डिझायर कार.
मारुती सुझकी देशात अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांना उत्तम कार्स देण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी नवीन कार लाँच सुद्धा करत आहे आणि त्याच वेळी आपल्या सध्याच्या कार्समध्ये बदल करून त्याचे अपडेटेड व्हर्जन सुद्धा मार्केटमध्ये लाँच करत आहे. नुकतेच कंपनीने डिझायरचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कंपनीने LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या एकूण चार व्हेरियंटमध्ये नवीन Dezire लाँच केली आहे. ही कार गॅलंट रेड, अल्युरिंग ब्लू, नटमेग ब्राउन, ब्लूश ब्लॅक, आर्क्टिक व्हाईट, मॅग्मा ग्रे आणि स्प्लेंडिड सिल्व्हर यासह 7 कलर ऑप्शनमध्ये आणली आहे. या कारचे अधिकृत बुकिंग सुरू झाले असून, फक्त 11,000 रुपयात ही कार बुक करता येणार आहे.
हे देखील वाचा: देशात इलेक्ट्रिक गाड्यांना ग्राहकांकडून पसंती; जाणून घ्या, काय आहे आताचा EV रिपोर्ट
कंपनीने या कारच्या लूक आणि डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन फ्रंट ग्रिल, आयताकृती आणि शार्प एलईडी हेडलॅम्प, नवीन डिझाइन केलेले फॉग लॅम्प हाउसिंग, चंकी ग्लॉस ब्लॅक ट्रिम या कारला अधिक आकर्षक बनवत आहेत.
टेल लॅम्पमध्ये मागील बाजूस Y-आकाराची LED लाइटिंग वापरण्यात आली आहे. टेलगेटवर एक क्रोम पट्टी आहे जी दोन्ही टोकांना जोडलेली दिसते. बूट-लिडमध्ये स्पॉयलरसारखा उभार आहे, तर मागील बंपरमध्ये काही महत्वाचे घटक समाविष्ट आहेत. टॉप मॉडेलमध्ये डायमंड-कट अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
मारुती डिझायरच्या नवीन जनरेशनमध्ये मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात नऊ इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, 16 इंच अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, एलईडी लाईट्स, एलईडी फॉग लॅम्प, बॉडी कलर बंपर, हाय माऊंट एलईडी स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना, फ्रंट फूटवेल इल्युमिनेशन, लेदर रॅप्ड स्टीयरिंग आहे.
यासह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, टीपीएमएस, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो हेडलॅम्प, रिअर एसी व्हेंट, डिजिटल एसी पॅनल, सुझुकी कनेक्ट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
मारुतीने या नवीन जनरेशन कारला 6.79 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स शोरूम किंमतीवर लाँच केले आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.14 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी ही कार सबस्क्रिप्शनसह देखील देत आहे. कारची इंट्रोडक्टरी किंमत 31 डिसेंबर 2024 पर्यंत व्हॅलिड असेल.