
फोटो सौजन्य: @shreemallatheru/ X.com
टाटा सिएराच्या बेस मॉडेलची किंमत 11.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलची किंमत 18.49 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही दिल्लीमध्ये टाटा सिएरा स्मार्ट प्लस 1.5 रेवोट्रॉन एमटी बेस व्हेरिएंट खरेदी केली तर ऑन-रोड किंमत सुमारे 13.44 लाख रुपये असेल. यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. ही किंमत व्हेरिएंट आणि शहरानुसार बदलू शकते.
टाटा सिएराच्या बेस मॉडेलला फायनान्स करण्यासाठी, तुम्हाला किमान 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल, म्हणजेच कर्जाची रक्कम 11.44 लाख रुपये असेल. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि बँक 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने हे कर्ज देत असेल तर, EMI अंदाजे 23,751 (६० महिन्यांसाठी) हजार रुपये असेल.
सिएराचे बेस मॉडेल 1.5-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे, जे 1498 सीसी आहे. हे इंजिन 105 बीएचपी पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले, हे इंजिन शहरात आणि महामार्गावर सुरळीत ड्रायव्हिंग प्रदान करते. हाय स्पीडने देखील, इंजिन डगमगत नाही. टाटा सिएरा 2025 मध्ये 18.2 किमी/लीटर एआरएआय-प्रमाणित मायलेज आहे.
Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या
२ लाखांचे डाउन पेमेंट आणि सुमारे 24000 रुपयांच्या मासिक EMI सह, टाटा सिएरा 2025 चे बेस मॉडेल स्टाईल, सुरक्षितता आणि परफॉर्मन्सचा समतोल साधणाऱ्या कुटुंबांसाठी परिपूर्ण आहे. जर तुम्ही या बजेटमध्ये सिएरा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या जवळच्या टाटा डीलरशिपला भेट द्या आणि टेस्ट ड्राइव्ह घ्या.