फोटो सौजन्य: X.com
टाटा सिएरा तिच्या मस्क्युलर आणि अपराइट डिझाइनमुळे दमदार रोड प्रेझेन्स देते. आकाराच्या बाबतीतही सिएरा ह्युंदाई क्रेटापेक्षा मोठी आहे. सिएराची लांबी 4340 मिमी, रुंदी 1841 मिमी, उंची 1715 मिमी आणि व्हीलबेस 2730 मिमी आहे. तर क्रेटाची लांबी 4330 मिमी, रुंदी 1790 मिमी, उंची 1635 मिमी आणि व्हीलबेस 2610 मिमी आहे. या मोठ्या डायमेंशन्समुळे सिएरा आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक केबिन स्पेस आणि 622 लिटरचा विशाल बूटस्पेस देते, जो क्रेटाच्या 433 लिटर बूटस्पेसपेक्षा खूपच जास्त आहे.
दोन्ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहेत आणि दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सची योजना देखील आहे. क्रेटामध्ये 1.5L MPi पेट्रोल, 1.5L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन मिळते. तर सिएरामध्ये 1.5L टर्बो-पेट्रोल (167.7 bhp) आणि 1.5L डिझेल इंजिन दिले आहे.
कागदावर पाहता, सिएराचे टर्बो-पेट्रोल इंजिन क्रेटाच्या 1.5L टर्बो इंजिनपेक्षा अधिक पॉवरफुल असून उत्तम परफॉर्मन्सची अपेक्षा निर्माण करते. मात्र, क्रेटा CVT, टॉर्क कन्व्हर्टर आणि DCT असे विविध ट्रान्समिशन पर्याय देते, ज्यामुळे ती बाजारात स्मूथ आणि विश्वसनीय ड्रायव्हिंग अनुभव देणारी SUV म्हणून ओळखली जाते.
Innova Crysta ला ‘ही’ Electric Car पाणी पाजणार! फीचर्स आणि सेफ्टीवर विशेष लक्ष
फीचर्सच्या बाबतीत नवीन टाटा सिएरा खरोखरच नवीन बेंचमार्क बनवते. यात तीन डिजिटल स्क्रीन्स (ड्रायव्हर, इन्फोटेनमेंट आणि सहचालक), सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरमिक सनरूफ, लेवल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) आणि JBL साउंडबारसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. ह्युंदाई क्रेटाही वेंटिलेटेड सीट्स, ड्यूल-स्क्रीन सेटअप आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह उत्तम प्रकारे सुसज्ज आहे, पण सिएराच्या तुलनेत तिचे फीचर पॅकेज थोडे पारंपरिक वाटते. अत्याधुनिक आणि सेगमेंट-फर्स्ट फीचर्स हवे असतील तर सिएरा आघाडीवर आहे.
जर तुम्हाला पॉवरफुल अनुभव, अधिक जागा आणि नवीन तंत्रज्ञान (जसे की ADAS आणि ट्रिपल स्क्रीन) हवे असतील, तर टाटा सिएरा हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार अशा खरेदीदारांसाठी आहे ज्यांना बोल्ड आणि वैशिष्ट्यपूर्ण SUV हवी आहे.
जर तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत मजबूत रिसेल व्हॅल्यू, ट्रान्समिशन पर्यायांची विस्तृत श्रेणी आणि आरामदायी शहरी ड्राइव्ह असेल, तर हुंडई क्रेटा ही अधिक व्यावहारिक आणि सुरक्षित निवड आहे.






