
टेकटनची दमदार कामगिरी
निसान टेकटनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹10.49 लाख आहे. या SUV मध्ये 2 टर्बो-पेट्रोल इंजिन ऑप्शन मिळतात. T160 इंजिन 100 PS पॉवर आणि 166 Nm टॉर्क देते, तर T280 इंजिन 163 PS आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. T280 सोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड वेट-क्लच DCT गिअरबॉक्सचा ऑप्शन आहे. DCT व्हेरिएंट 18.5 kmpl मायलेज देण्याचा दावा करते आणि 0 ते 100 kmph वेग 9.89 सेकंदात गाठते.
मॅग्नाइटमध्ये पेट्रोलसोबत CNG ऑप्शन
निसान मॅग्नाइटची सुरुवातीची किंमत ₹5.69 लाख आहे. यात 1.0L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 72 PS आणि 96 Nm पॉवर देते. टर्बो-पेट्रोल इंजिन 100 PS पॉवर जनरेट करते. टर्बो-मॅन्युअलमध्ये 160 Nm, तर CVT व्हेरिएंटमध्ये 152 Nm टॉर्क मिळतो. SUV मध्ये 205 mm ग्राउंड क्लीअरन्स आणि 336 लिटर बूट स्पेस असून CNG ऑप्शनही अव्हेलेबल आहे.
ग्रॅव्हाइट देणार 7-सीटरचा ऑप्शन
निसान ग्रॅव्हाइटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.73 लाख आहे. या 7-सीटर MPV मध्ये 1.0L 3-सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 72 PS आणि 96 Nm पॉवर देते. 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळतात. मॅन्युअलचे मायलेज 19.3 kmpl, तर AMTचे 19.6 kmpl असल्याचा दावा आहे. CNG व्हेरिएंटचाही ऑप्शन आहे.
मेंटेनन्सचीही काळजी
निसानच्या Service Promise अंतर्गत 3 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि स्टँडर्ड वॉरंटी दिली जाते. याशिवाय 10 वर्षांपर्यंत एक्स्टेंडेड वॉरंटी, 3 वर्षांचा प्रीपेड मेंटेनन्स प्लॅन आणि 1.5 तासांत एक्स्प्रेस सर्व्हिसचा पर्याय आहे. मेंटेनन्स खर्च 40 पैसे प्रति km असल्याचे कंपनी सांगते. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये निसानच्या या तिन्ही मॉडेल्सवरील ऑफर्स कस्टमर्ससाठी आकर्षक ठरू शकतात.