Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात देखील होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरवर परिणाम होत आहे. नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 01:58 PM
केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Follow Us
Follow Us:
  • Ola ने केला धमाका! इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत थेट ₹49,999 वर
  • पेट्रोल महागाईत Ola ची मोठी चाल; इलेक्ट्रिक वाहनांवर 50 हजारांपर्यंत फायदा
  • Ola Electric चा जबरदस्त डिस्काउंट; स्कूटर आणि बाईक कमी किमतीत मिळणार
Ola Electric ने ‘एंडआईसएज’ (EndICEAge) नावाची एक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमअंतर्गत कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसाईकलच्या किंमती कमी करत आहे. कंपनीने जाहीर केलेली ही ऑफर 31 मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या ऑफरअंतर्गत, आता सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 49,999 रुपये झाली आहे. अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे संकट अधिक भीषण झाले आहे. याच कारणामुळे आता ओला इलेक्ट्रिक त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. ओला आता त्यांच्या गाड्यांवर 8 वर्षांची अपघात वॉरंटी देखील देत आहे.

Electric Scooters : पेट्रोलला रामराम! 90 हजारांत 322 किमी रेंजची दमदार ई-स्कूटर; ओला-टीव्हीएस-बजाजलाही टक्कर

अर्ध्या किंमतीत घरी घेऊन या ओला स्कूटर

ओला ईलेक्ट्रिकने त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनी त्यांच्या दोन मॉडेल Ola S1 X (2kWh जेन 3) स्कूटर आणि Roadster X (2.5kWh) बाईकची सुरुवातीची किंमत कमी करून फक्त 49,999 रुपये (एक्स-शोरूम) केली आहे. याव्यतिरिक्त, ओला त्यांच्या संपूर्ण स्कूटर आणि बाईक लाईनअपवर 50 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ग्राहक 31 मार्च 2026 पर्यंत या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहेत. अशा परिस्थितीत जर काळजीपूर्वक पाहिले तर, सर्वसामान्य पेट्रोल बाईक्स आणि स्कूटर्सच्या तुलनेत ओलाच्या बाईक्स आणि स्कूटर्स निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे ओलाच्या बाईक्स आणि स्कूटर्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा कंपनीचा प्रयत्न

ओला इलेक्ट्रिकचे सीएमडी भाविश अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे की, पेट्रोलच्या वाढत्या किंमती आपल्याला संकेत देत आहेत की, आपल्याला ऊर्जा आत्मनिर्भरतेची गरज आहे. कंपनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कंपनीचे असे ध्येय आहे की, लोकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा देणे आणि लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास प्रोत्साहित करणे.

Car Care Tips: वेळेआधीच धोका देऊ शकतात कारमधील ‘हे’ 4 सेन्सर्स! वेळीच राहा स्मार्ट

ओलाची नवीन गॅरंटी

कंपनी आता सर्विस ट्रस्ट गॅरंटी देत आहे. जर तुमच्या गाडीची सर्व्हिस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा झाली, तर प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी कंपनी तुम्हाला मोफत ओला कॅब व्हाउचर्स देणार आहे. ओला आता 60% पर्यंतची खात्रीशीर बायबॅक व्हॅल्यू देत आहे. भविष्यात जेव्हा तुम्ही नवीन ओला उत्पादन खरेदी कराल, तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. अशा पद्धतीने कंपनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.

Web Title: Ola electric scooter price cut to 49999 company announced big discount offers for limited period auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Auto
  • electric scooter
  • Ola Electric

संबंधित बातम्या

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?
1

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
2

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

Omega Seiki Mobility आणणार दिव्यांगांसाठी स्पेशल इलेक्ट्रिक गाडी; तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज
3

Omega Seiki Mobility आणणार दिव्यांगांसाठी स्पेशल इलेक्ट्रिक गाडी; तंत्रज्ञानाने असणार सुसज्ज

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
4

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.