फोटो सौजन्य: @autowritetr/ X.com
भारतीय ऑटो बाजार म्हणजे प्रत्येक ऑटो कंपनीसाठी व्यापाराची मोठी संधी! याच संधीचे सोनं करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात दमदार कार ऑफर करत असतात. ग्राहक देखील या कंपन्यांच्या वाहनांना चांगला प्रतिसाद देतात. चीनच्या ऑटो कंपनी सुद्धा भारतात कार ऑफर करत असतात. त्यांच्या BYD वाहनांची भारतात चांगली विक्री होत आहे. त्यात आता चीनची अजून एक कंपनी भारतीय ऑटो बाजारात येणास सज्ज होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनची वाहन निर्माता कंपनी Chery ने आपल्या एका नवीन कारचे पेटंट भारतात दाखल केले आहे. ही कार सेडान सेगमेंटमध्ये असून, चीनमध्ये ती Chery Arrizo 8 या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? EMI किती?
विशेष म्हणजे, भारतात Chery कंपनीकडून दाखल करण्यात आलेले हे दुसरे पेटंट आहे. यापूर्वी कंपनीने Tiggo 8 SUV या मॉडेलचं डिझाईन पेटंट सुद्धा भारतात नोंदवलं होतं. या नव्या सेडान मॉडेलमध्ये कोणती खास फीचर्स असतील आणि ती भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता किती आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Chery Arrizo 8 ही कार कंपनीकडून PHEV (प्लग-इन हायब्रीड) आणि पेट्रोल इंजिन या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध केली जाते. यात 1.6-लिटर T-GDi इंजिन दिलं गेलं आहे, जे 200 बीएचपी पॉवर आणि 290 Nm टॉर्क निर्माण करतं. या इंजिनसह 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) दिलं जातं, जे कारचं परफॉर्मन्स आणि गिअर शिफ्टिंग अधिक स्मूथ बनवतं.
याशिवाय दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 1.5-लिटर इंजिनसह बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे या कारला सुमारे 105 किलोमीटरची अतिरिक्त इलेक्ट्रिक रेंज मिळते. या पॉवरट्रेनमधून तब्बल 351 बीएचपी पॉवर आणि 515 Nm टॉर्क निर्माण होतं. ही सेडान केवळ 7.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास स्पीड पकडू शकते म्हणजेच परफॉर्मन्सच्या दृष्टीने ती अत्यंत दमदार आहे.
Royal Enfield Meteor 350 की Yezdi Roadster, GST कमी झाल्याने कोणती बाईक झाली स्वस्त?
Chery Arrizo 8 मध्ये आधुनिक आणि प्रीमियम फिचर्सचा भरपूर समावेश करण्यात आला आहे. यात पॉवर्ड ड्रायव्हर सीट,ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री, 24.6-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, 540 डिग्री पॅनोरॅमिक व्ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जर, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, पॅनोरॅमिक सनरूफ, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, तसेच ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरज आणि मल्टीपल एअरबॅग्स सारखे सेफ्टी फिचर्सही देण्यात आली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या कारसाठी फक्त पेटंट दाखल केले आहे. भारतात येण्याची अधिकृत घोषणा त्यांनी अजून तरी केलेली नाही. त्यामुळे, सध्या कंपनी भारतीय बाजारपेठेत त्यांच्या कार सादर करेल अशी शक्यता कमी आहे. मात्र, इतर अनेक परदेशी कंपन्यांप्रमाणे, ते भविष्यात भारतात त्यांच्या कार सादर करू शकते.