Royal Enfield Meteor 350 की Yezdi Roadster, GST कमी झाल्याने कोणती बाईक झाली स्वस्त?
भारतामध्ये 22 सप्टेंबरपासून लागू झालेल्या GST 2.0 चा परिणाम ऑटो सेक्टरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः 350cc इंजिन कॅटेगरीतील बाईक्सच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. याचा सर्वाधिक फायदा Royal Enfield Meteor 350 आणि Roadster सारख्या लोकप्रिय बाईक्सना झाला आहे. या दोन्ही बाईक्स अंदाजे 349cc आणि 334cc इंजिनसह येतात, नवीन जीएसटी दरांमुळे त्यावरील टॅक्स अजून कमी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या किंमतींमध्ये हजारो रुपयांची बचत मिळू शकते.
GST 2.0 लागू झाल्यानंतर Royal Enfield Meteor 350 च्या किंमतीत सुमारे 17,000 ते 19,000 रुपयांपर्यंत पर्यंत घट झाली आहे. पूर्वी ही बाईक 2.08 लाख ते 2.33 लाख दरम्यान उपलब्ध होती, तर आता याची नवीन किंमत 1.91 लाख ते 2.14 लाख दरम्यान आहे. अलीकडे Meteor मध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स करण्यात आले आहेत.
‘हा’ बजेट प्लॅन अन् 30 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा खरेदी करेल Maruti WagonR
यात 349cc J-सीरीज सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 20.4hp पॉवर आणि 27Nm टॉर्क निर्माण करते. Meteor आपल्या स्मूथ परफॉर्मन्स, रॉयल डिझाइन आणि लाँग-डिस्टन्स कम्फर्टसाठी प्रसिद्ध आहे.
Yezdi Roadster 2025 ची लाँच किंमत 2.10 लाख रुपये होती, परंतु GST 2.0 लागू झाल्यानंतर ती किंमत घटून 1.94 लाख इतकी झाली आहे, म्हणजेच सुमारे 16,000 रुपयांची थेट बचत! नवीन Roadster मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये करण्यात आला आहे.
यात ब्रँडचे नवीन Alpha2 इंजिन 334cc सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड मोटर देण्यात आले आहे, जे 29.1hp पॉवर आणि 29.6Nm टॉर्क निर्माण करते. Roadster आपल्या दमदार इंजिन, आधुनिक डिझाइन आणि मजबूत परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.
‘हे’ आहेत 70,000 रुपयांच्या बजेटमध्ये एकदम टकाटक स्कूटर, GST 2.0 मुळे किमती झाल्या अजूनच कमी
GST सुधारणा लागू झाल्यानंतर या दोन्ही बाईक्सच्या किंमतींमधील फरक अत्यंत कमी झाला आहे. Royal Enfield Meteor 350 ची सुरुवातीची किंमत 1.91 लाख, तर Yezdi Roadster ची किंमत 1.94 लाख रुपये आहे म्हणजेच Meteor सुमारे ₹4,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र, Meteor च्या बेस मॉडेलमध्ये स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स दिले आहेत, तर Roadster मध्ये ट्यूबलेस टायर्स मिळतात, जे मेंटेनन्सच्या दृष्टीने अधिक सोयीचे आहेत.
जर तुम्हाला विश्वासार्हता, कमी मेंटेनन्स आणि दीर्घकालीन स्थिर परफॉर्मन्स हवे असतील, तर Royal Enfield Meteor 350 हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पण जर तुम्ही स्टाइल आणि पॉवरला प्राधान्य देता, तर Yezdi Roadster तुमच्यासाठी परफेक्ट चॉइस आहे.