"उन्नत पॉडकार " वाहतूक ही भविष्यातील नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल, काय आहे उन्नत पॉडकार
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये ” स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली ” प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहाणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.
नुट्रान EV मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित ” उन्नत पॉडकार ” वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅक वर जोडल्या जातात. ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकार मध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने या पॉर्ड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टम वर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात.
मंत्री सरनाईक यांनी ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथील ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल. असे प्रतिपादन केले.
यावेळी माननीय परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांमध्ये या संस्थेचे सहसंस्थापक श्री. भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले.
कुर्ला आणि वांद्रे दरम्यानची वाहतूक समस्या संपवण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. लोकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी सरकार पॉड टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांदा आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यानच्या ८.८ किमी लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी चालविण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत बांधला जाईल.
पॉड टॅक्सी प्रकल्पांतर्गत, कुर्ला आणि वांद्रे दरम्यान ८.८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधला जाईल. या मार्गावर पॉड टॅक्सी ताशी ४० किलोमीटर वेगाने धावेल. या मार्गावर ३८ स्थानके असतील. याअंतर्गत प्रवाशांना एअर टॅक्सी सेवा दिली जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकांची ये-जा सोपी होईल. प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कमी वेळेत हा प्रवास पूर्ण करता येईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही पॉड टॅक्सी खूपच चांगली आहे. पॉड टॅक्सी ही एक तांत्रिक कार आहे, जी उर्जेच्या मदतीने चालते. यामध्ये ड्रायव्हरची गरज नाही. हे पूर्णपणे स्वयंचलित आहे. एका पॉड टॅक्सीमध्ये एका वेळी ३ ते ६ प्रवासी प्रवास करू शकतात.