फोटो सौजन्य: iStock
भारतात बजेट फ्रेंडली बाईक्स सर्वात जास्त विकल्या जातात, कारण अनेक ग्राहकांना स्वस्त किंमतीत उत्तम मायलेज देणारी बाईक हवी असते. परंतु, आजकाल अनेक तरुण स्पोर्ट्स बाईकची कदाचित अधिक आवड घेत आहेत. स्पोर्ट्स बाईकचा आकर्षक लूक आणि दमदार परफॉर्मन्स त्यांना मोठ्या आकर्षणात ओढतो.
या बाईक्सची वेगवेगळी फीचर्स, आणि हाय-स्पीड तरुणांना आकर्षित करतात. काही तरुण स्पोर्ट्स बाईक विकत घेण्याचे स्वप्न देखील बघतात, कारण त्यांना एका दमदार आणि स्टायलिश बाईकवर राइड करण्याची आवड असते.
भारतात अनेक स्पोर्ट्स बाईक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे Aprilia. या कंपनीच्या बाईक्स फक्त सामन्यांमध्ये नाही तर सेलिब्रेटी मंडळींमध्ये देखील लोकप्रिय आहे. बॉलिवूड अभिनेता John Abraham ला सुद्धा अनेक बाईक्स राइड करण्याचा छंद आहे. आता त्याची आवडती बाईक Aprilia RS 457 ची किंमत वाढवण्यात आली आहे. या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी महाग झाली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
Bharat Mobility Expo 2025 मध्ये Vinfast च्या ‘या’ 2 इलेक्ट्रिक एसयूव्ही होणार सादर
रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या एंट्री लेव्हल सुपर बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 हजार रुपयांनी वाढवली आहे. ही किंमतीतील वाढ तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. अशा परिस्थितीत आता ही बाईक खरेदी करण्यासाठी नवीन किंमत मोजावी लागेल.
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात या बाईकची एक्स-शोरूम किंमत ४.२० लाख रुपये झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत ४.२३ लाख रुपये असेल. एप्रिलियाच्या वेबसाइटवर, तसेच ऑफलाइन बुक करता येईल.
एप्रिलिया आरएस 457 ही पूर्णपणे फेयर्ड बाईक म्हणून ऑफर केली जात आहे. यात एलईडी हेडलाइट, इंजिन मॅप, ड्युअल चॅनेल एबीएससह रोल ओव्हर सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, पाच इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रायडिंगसाठी तीन मोड आहेत. यात १७-इंच टायर आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. या बाईकमध्ये १३ लिटर क्षमतेची पेट्रोल टँक आहे. ही बाईक 41 मिमी यूएसडी फोर्क्ससह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाईक रेसिंग स्ट्राइप्स, प्रिझमॅटिक डार्क आणि ओपॅलेसेंट लाईट अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
‘या’ दुचाकी कंपनीचा नादच खुळा! 2025 मध्ये एक दोन नव्हे तर 14 बाईक्स करणार लाँच
एप्रिलिया आरएस ४५७ मध्ये, कंपनी राईड बाय वायर तंत्रज्ञानासह ४५७ सीसी डबल पॅरलल फॉरवर्ड फेसिंग सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन प्रदान करते. या इंजिनसह, बाईकला ४७.६ हॉर्सपॉवर आणि ४३.५ न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.
या बाईकसोबत असेल स्पर्धा
भारतीय बाजारपेठेत, एप्रिलिया आरएस ४५७ ही Yamaha YZF R3, KTM RC 390, Kawasaki Ninja 400 सारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करते.