फोटो सौजन्य: Social Media
17 जानेवारीला आयोजित केलेल्या भारत मोबिलिटी 2025 मध्ये अनेक ऑटो कंपनी सहभागी होणार आहे. यात स्वदेशी सोबतच आता विदेशी कंपनी सुद्धा आपल्या आगामी कार्स सादर करतील. व्हिएतनामी ऑटो कंपनी Vinfast देखील आपल्या आगामी कार्स या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करणार आहे.
ऑटो एक्स्पो 2025 च्या आधी, ऑटोमेकर कंपनी विनफास्टने एक टीझर रिलीज केला आहे. या टीझरद्वारे कंपनीने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. व्हिएतनामी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी विनफास्ट ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही VF7 आणि VF9 सादर करणार आहे. विनफास्टच्या या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही जागतिक स्तरावर कोणत्या फीचर्ससह येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
ही ५-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे जी एलईडी डीआरएल, लाइटिंग एलिमेंट्ससाठी ट्रॅपेझॉइडल हाऊसिंग आणि वक्र बोनेटसह डिझाइनसह येते. यात चमकदार काळे फेंडर्स, जाड बॉडी क्लॅडिंग, डोअर मोल्डिंग्ज आणि मोठे 20-इंच अलॉय व्हील्स आहेत.
VF7 मध्ये फ्लश डोअर हँडल, ब्लॅक-आउट पिलर आणि इंटिग्रेटेड टर्न सिग्नलसह ड्युअल-टोन ORVM आहेत. मागील बाजूस रेक्ड विंडशील्ड, छतावरील एक प्रमुख स्पॉयलर, शार्क फिन अँटेना आणि एक लेयर्ड टेलगेट आहे. त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला समान लायटिंग एलिमेंट दिले आहेत.
जागतिक VF7 इको आणि प्लस या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये 75.3 kWh बॅटरी देण्यात आली आहे. इको व्हेरियंटमध्ये सिंगल मोटर देण्यात आली आहे तर प्लस व्हेरियंटमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. इको व्हेरियंट 201 एचपी पॉवर आणि 310 एनएम टॉर्क जनरेट करतो तर प्लस व्हेरियंट 348 एचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करतो.
Toyota Innova Hycross च्या वेटिंग पिरियडमुळे कंटाळले आहात? मग ‘या’ 5 कार्सचा विचार नक्की करा
VF7 मध्ये हायवे असिस्ट (लेव्हल २), लेन सेंटरिंग असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि इमर्जन्सी लेन कीप असिस्ट सारख्या ADAS फीचर्सचा समावेश आहे. त्याच्या टॉप स्पेक व्हेरियंटला 431 किमी (WLTP) ची रेंज मिळते.
ही ७-सीटर प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. यात आकर्षक एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल, एक शिल्पित बोनेट आणि एक मोठे क्लोज ग्रिल आहे. त्याच्या साइड प्रोफाइलमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स, फ्लश डोअर हँडल आणि ब्लॅक-आउट पिलर आहेत. हे क्रिमसन रेड, विनफास्ट ब्लू आणि जेट ब्लॅक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
VF9 मध्ये १५.६-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, एअर क्वालिटी कंट्रोल, हीटेड स्टीअरिंग व्हील आणि पॅनोरॅमिक फिक्स्ड ग्लास रूफ अशा प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यात ADAS फीचर्स देण्यात आले आहेत. त्याच्या इको व्हेरियंटची रेंज 531 किलोमीटर आहे आणि प्लस व्हेरियंटची रेंज 468 किलोमीटर आहे.