भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये Honda Activa e आणि QC1 च्या किंमती जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 ची सुरुवात झाली. हा ऑटो एक्स्पो मध्ये १७ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक ऑटो कंपन्या सहभागी होणार आहेत. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआय) २०२५ च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये गतिशीलतेच्या भविष्याला आकार देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने आता होंडा अॅक्टिव्हाच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
होंडाने ACTIVA e: आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटर्स करतील, ज्यांची प्रारंभिक किंमत अनुक्रमे १,१७,००० रुपये आणि ९०,००० रुपये एक्स-शोरूम ठरवली आहे. या EVs साठी कंपनीने Care Packages सुरू केली आहेत, जे वाहनाच्या दीर्घायुष्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
त्सुत्सुमू ओटानी, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ, HMSI, म्हणाले, “होंडामध्ये, आम्ही नवकल्पना आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाद्वारे मोबिलिटीच्या भविष्याची आकारणी करतो. ACTIVA e: आणि QC1 सह, आम्ही विविध ग्राहकांच्या गरजांसाठी तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स सादर करत आहोत.”
Yamaha कडून भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ‘या’ बाईक्सचे दमदार प्रदर्शन
योगेश माथुर, संचालक, विक्री आणि विपणन, HMSI, म्हणाले, “नवीन ACTIVA e: स्वॅपेबल बॅटरी तंत्रज्ञान आणि QC1 फिक्स्ड बॅटरी सेटअप भारतीय ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात ठेवून डिझाइन केले गेले आहेत.”
ACTIVA e: आणि QC1 या दोन्ही EVs भारतातील शहरी गतिशीलतेला पुन्हा परिभाषित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. ACTIVA e: तीन शहरांमध्ये, बेंगळुरूमध्ये फेब्रुवारी २०२५ आणि दिल्ली व मुंबईमध्ये एप्रिल २०२५ पासून उपलब्ध होईल. QC1 सहा शहरांमध्ये उपलब्ध असेल.
दोन्ही मॉडेल्स ३ वर्षांची वॉरंटी आणि ५०,००० किमी पर्यंत सेवा देणार आहेत. तसेच, HMSI ने पॅन-इंडिया केअर प्लस पॅकेज सुरू केले आहे, ज्यामध्ये ५ वर्षांची वॉरंटी आणि ५ वर्षांसाठी रोडसाइड असिस्टन्स (RSA) मिळते.
Maruti Suzuki e Vitara च्या रेंजवर झाले शिक्कामोर्तब, Auto Expo 2025 मध्ये होणार सादर
ACTIVA e: मध्ये ७.० इंच TFT डिस्प्ले, Honda RoadSync Duo® अॅपद्वारे कनेक्टिव्हिटी, आणि स्वॅपेबल बॅटरी सिस्टम आहे, ज्यामुळे १०२ किमी रेंज मिळते. त्यात दोन १.५ kWh स्वॅपेबल बॅटरी आहेत. या स्कूटरची सर्वोच्च गती ८० किमी/तास आहे.
QC1 मध्ये १.५ kWh चा बॅटरी पॅक आहे, जो ८० किमी रेंज देतो. याला ४ तास ३० मिनिटांत ० ते ८०% चार्ज करता येते. ५.० इंच LCD डिस्प्ले, USB टाईप-C आउटलेट आणि २६ लिटर सीट खाली स्टोरेज स्पेस सारखी फीचर्स QC1 ला बेस्ट स्कूटर बनवतात.