फोटो सौजन्य: iStock
जेव्हापासून 2025 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे, तेव्हापासून अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किमतीत वाढ केली आहे. आता सुद्धा अनेक कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करत आहे. नुकतेच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय कारच्या किमती वाढवल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार्स सादर केल्या आहेत. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे Wagon R. आजही विक्रीच्या बाबतीत ही कार भल्याभल्या कार्सना मागे सोडत आहे. पण आता या कारची किंमत वाढवण्यात आली आहे.
स्वतःची कार घेण्याच्या तयारीत आहात? तर मग ‘या’ 4 हॅचबॅक कारचा नक्की विचार करा
Maruti Suzuki ने 8 एप्रिल 2025 पासून वॅगनआरच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने वॅगनआरच्या सर्व व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. आता यांची किंमत 14,000 रुपयांनी वाढली आहे. टक्केवारीच्या बाबतीत, ही किंमत 2.48% पर्यंत वाढ आहे. कारच्या मागील मधल्या सीटवर बसणाऱ्यासाठी 4 एक्सट्रा एअरबॅग्ज आणि 3-पॉइंट सीटबेल्ट सारख्या सेफ्टी फीचर्समुळे ही किंमत वाढवण्यात आली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
एप्रिल 2025 मध्ये मारुती वॅगनआरच्या एक्स-शोरूम किंमतीत सरासरी ₹14,000 ची वाढ झाली आहे. ही वाढ सर्व व्हेरियंटवर लागू असून, किंमतवाढीचं प्रमाण साधारणतः 1.87% ते 2.48% दरम्यान आहे. पुढीलप्रमाणे विविध मॉडेल्ससाठी जुन्या आणि नव्या किमतीची तुलना दिली आहे.
स्वतःची कार घेण्याच्या तयारीत आहात? तर मग ‘या’ 4 हॅचबॅक कारचा नक्की विचार करा
LXI: जुनी किंमत ₹5,64,500, नवीन किंमत ₹5,78,500 (वाढ: 2.48%)
VXI:जुनी किंमत ₹6,09,500, नवीन किंमत ₹6,23,500 (वाढ: 2.30%)
ZXI: जुनी किंमत ₹6,38,000, नवीन किंमत ₹6,52,000 (वाढ: 2.19%)
ZXI Plus: जुनी किंमत ₹6,85,500, नवीन किंमत ₹6,99,500 (वाढ: 2.04%)
ZXI Plus DT: जुनी किंमत ₹6,97,500, नवीन किंमत ₹7,11,500 (वाढ: 2.01%)
VXI: जुनी किंमत ₹6,59,५००, नवीन किंमत ₹6,73,500 (वाढ: 2.12%)
ZXI: जुनी किंमत ₹6,88,000, नवीन किंमत ₹7,02,000 (वाढ: 2.03%)
ZXI Plus: जुनी किंमत ₹7,35,500, नवीन किंमत ₹7,49,500 (वाढ: 1.90%)
ZXI Plus DT: जुनी किंमत ₹7,47,500 नवीन किंमत ₹7,61,500 (वाढ: 1.87%)
LXI: जुनी किंमत ₹6,54,500 नवीन किंमत ₹6,68,500 (वाढ: 2.14%)
VXI: जुनी किंमत ₹6,99,500 नवीन किंमत ₹7,13,500 (वाढ: 2.00%)