फोटो सौजन्य: iStock
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची प्रार्थना करते, तर भाऊ तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतो. भेटवस्तू ही फक्त वस्तू नसून ती भावना व्यक्त करणारा एक खास क्षण असतो. मात्र, अनेकदा भावांना आपल्या बहिणीला काय भेट द्यावी हे ठरवताना गोंधळ होतो.
जर तुमच्या बहिणीला स्कूटर चालवायला आवडत असेल तर तिला उत्तम मायलेज देणारा स्कूटर तुम्ही नक्कीच गिफ्ट करू शकता. स्टायलिश आणि परवडणारी स्कूटर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या स्कूटर्स बजेटमध्ये बसतात आणि रोजच्या प्रवासासाठी सोयीस्कर आहेत. येथे आम्ही अशा काही स्कूटर्सची माहिती दिली आहे, ज्यांच्या किंमती केवळ ₹७५ हजारांपासून सुरू होतात.
आरामदायी राईडसाठी ओळखली जाणारी TVS ज्युपिटर 110 ची किंमत ₹73,340 ते ₹87,250 (एक्स-शोरूम) आहे. यात 113.3cc एअर-कूल्ड इंजिन असून 50-52 किमी प्रति लिटर मायलेज मिळते. मोबाईल चार्जिंग पोर्ट, मोठी स्टोरेज स्पेस आणि स्मूथ रायडिंगचा अनुभव यामुळे ती लोकप्रिय आहे.
विशेषतः महिलांसाठी डिझाइन केलेली ही स्कूटर ₹70,838 ते ₹82,738 (एक्स-शोरूम) दरम्यान उपलब्ध आहे. 110.9cc एअर-कूल्ड इंजिनासह ती 50-55 किमी प्रति लिटर मायलेज देते. रेट्रो-मॉडर्न डिझाईन, साइड स्टँड इंडिकेटर, मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि हलके वजन यामुळे ती महिलांमध्ये लोकप्रिय आहे.
परफॉर्मन्स-केंद्रित ही स्कूटर ₹80,700 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात 124cc एअर-कूल्ड इंजिन असून 45-50 किमी प्रति लिटर मायलेज मिळते. दमदार इंजिन आणि सुरळीत राईडमुळे ती शहरासोबतच महामार्गावरही उत्कृष्ट प्रदर्शन करते.
ट्रेंडी आणि स्टायलिश लूकसह ही स्कूटर सुमारे ₹80,000 (एक्स-शोरूम) किमतीत मिळते. 125cc एअर-कूल्ड इंजिन 58 किमी प्रति लिटर मायलेज देते. फक्त 99 किलो वजनामुळे ती हाताळायला सोपी आहे. आकर्षक डिझाईन आणि उत्तम इंधन कार्यक्षमतेमुळे ती ट्रेंडी आणि हलकी वाहने पसंत करणाऱ्या महिलांसाठी आदर्श आहे.