फोटो सौजन्य: @vehicleseries (X.com)
पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त्त त्याच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्षकेंद्रित करत होते. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आजचा ग्राहक विशेषकरून, तरुणांना स्टायलिश आणि स्पोर्टी बाईक हवी असते. तरुणांची हीच मागणी लक्षात घेत, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट स्पोर्टी बाईक ऑफर करत असतात. KTM ही त्यातीलच एक कंपनी.
KTM ने भारतात एक नवीन बाईक KTM 160 Duke लाँच करणार आहे. त्याचा पहिला टीझर नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये कंपनी एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये एक नवीन आणि पॉवेफुल मॉडेल आणण्याची तयारी करत असल्याचे दिसून येते. असे मानले जाते की ही बाईक 125 Duke ची जागा घेईल, जी कमी विक्रीमुळे बंद करण्यात आली होती. KTM 160 Duke एक पॉवरफुल आणि आकर्षक पर्याय म्हणून सादर केली जाईल.
Harley-Davidson च्या ‘या’ 2 बाईकवर तब्बल 3 लाख रुपयांची सूट, लूक आणि डिझाइनमध्ये सगळ्यांमध्ये खास
टीझरमध्ये बाईकची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ऑटो तज्ञांच्या मते, ही नवीन बाईक KTM 200 Duke च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. याचा अर्थ असा की या बाईकला दुसऱ्या जनरेशनचे डिझाइन मिळेल, जे लोकांना आधीच खूप आवडत आहे. या नवीन बाईकमध्ये ट्रेलिस फ्रेम, 43mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन देखील दिसू शकते. याशिवाय, ड्युअल-चॅनेल ABS आणि LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. जर ही सर्व फीचर्स दिली गेली तर ही बाईक केवळ दिसायलाच स्टायलिश नसेल तर ती चालवण्यास खूप सुरक्षित आणि आरामदायी देखील असेल.
नवीन KTM 160 Duke मध्ये एक पूर्णपणे नवीन 160cc इंजिन दिले जाईल, जे सध्याच्या 200 Duke च्या इंजिनमधून घेतले जाईल. हे इंजिन सुमारे 19-20bhp पॉवर जनरेट करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ती एंट्री-लेव्हल परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक बनेल. हे पॉवरफुल इंजिन रोजच्या रायडिंगसाठी तसेच हायवे क्रूझिंगसाठी उत्तम असेल आणि जर KTMने त्यात सिग्नेचर थ्रोटी एक्झॉस्ट नोट कायम ठेवली तर ही बाईक तरुण रायडर्सना आवडू शकते.
बऱ्याच अहवालांनुसार, कंपनी ही नवीन KTM 160 Duke च्या मध्यात म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये लाँच करू शकते. फेस्टिव्ह सिझनपूर्वी बाईकला चांगली पकड मिळावी म्हणून ही वेळ निवडण्यात आली आहे. लाँच झाल्यानंतर, ही बाईक कंपनीची सर्वात परवडणारी परफॉर्मन्स बाईक असेल.