
फोटो सौजन्य - Social Media
या त्रुटींमुळे बाईकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे HMSI कडून देशभरातील अधिकृत बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर मोफत तपासणी आणि दुरुस्ती मोहीम राबवली जाणार आहे. आवश्यक असल्यास फ्युएल होजची रचना दुरुस्त केली जाईल आणि इंजिनमधील काही पार्ट्स बदलले जातील. विशेष म्हणजे, वाहन वॉरंटीमध्ये असो किंवा नसो, ही संपूर्ण सेवा ग्राहकांना विनामूल्य मिळणार आहे.
कंपनीकडून संबंधित ग्राहकांना कॉल, ई-मेल किंवा SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे. तसेच डीलरशिपवर जाण्यापूर्वी सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर VIN नंबर टाकून त्यांची बाईक रिकॉल मोहिमेत समाविष्ट आहे की नाही, हे तपासू शकतात.
Honda CB1000 Hornet SP मध्ये ९९९cc इनलाइन फोर-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते १५५ bhp पॉवर आणि १०७ Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये स्लिपर क्लच, बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टर, Honda Selectable Torque Control आणि पाच रायडिंग मोड्ससारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.
सेफ्टीसाठी या बाईकमध्ये पुढील बाजूस ३१०mm ड्युअल डिस्क ब्रेक्ससह Brembo रेडियल-माउंट कॅलिपर्स आणि मागील बाजूस २४०mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच ड्युअल-चॅनेल ABS फीचरही उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या सुपरबाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे १३.२९ लाख रुपये आहे.