(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Force Motors ची नवी Traveler N रेंज लॉन्च; आता अधिक मजबूत आणि हायटेक
सध्या ई-कारमधील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फिचरची जोरदार चर्चा होत आहे. हे फिचर केवळ वीज वाचवत नाही, तर कार चालवताना बॅटरी पुन्हा चार्ज करते. सर्वसामान्य पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांमध्ये आपण ब्रेक लावतो आणि त्यातून निर्माण होणारी उर्जा उष्णतेच्या रुपात हवेत वाया जाते.
पण नवीन फिचरमुळे इलेक्ट्रिक कारमध्ये ही उर्जा वाया घालवण्याऐवजी पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाणार आहे. कारचा वेग कमी जास्त करता किंवा एक्सलेटेरवरुन पाय काढता त्यावेळी कारमधील इलेक्ट्रिक मोटर एका जनरेटर प्रमाणे काम करते. यावेळी गाडीच्या गतीचे विजेमध्ये रुपांतर होते आणि ती बॅटरीच्या स्वरुपात वापरता येते.
EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित






